फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Rajasthan Royals match report : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सला आयपीएल २०२५ चा पहिला विजय हाती लागला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याच्या घरच्या मैदानावर शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला 6 धावांनी पराभूत केले आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्याच्या नाणेफेकमध्ये ऋतुराज गायकवाड यांनी जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात कॅप्टन रियान परागने फलंदाजीचा आव्हान स्वीकारत पहिले फलंदाजी करताना ९ विकेट गमावून १८२ धावा केल्या होत्या. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर खलील अहमद, नूर अहमद आणि मथीशा पाथिराणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले तर रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
Match 11. Rajasthan Royals Won by 6 Run(s) https://t.co/V2QijpWpGO #RRvCSK #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजी बद्दल बोलायचे झाले तर यशस्वी जयस्वालने फक्त ४ धावा केल्या तर राजस्थानचा सलामीविर फलंदाज संजू सॅमसनने १६ चेंडूंमध्ये २० धावा केल्या, यामध्ये त्यांनी एक षटकार आणि एक चौकार मारला. राजस्थान रॉयल्ससाठी नितीश राणाने संघासाठी महत्वाची खेळी खेळली आणि नितीश राणांच्या जोरावर संघाने १८२ धावांची मजबूत धावसंख्या उभी केली होती. नितीश राणाने संघासाठी ३६ चेंडूंमध्ये ८१ धावा केल्या, यामध्ये त्याने पाच षटकार आणि दहा चौकार ठोकले. राजस्थानचा कर्णधार रियान परागने संघासाठी २८ चेंडूंमध्ये ३७ धावा केल्या त्यांनी यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकार मारले तर सिमरोन हेटमायरने संघासाठी १९ धावा केल्या.
चेन्नई सुपर किंग्स फलंदाजीबद्दल बोलायचं झाले तर मागील दोन सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारा रचिन रवींद्र या सामन्यात स्वस्तात बाद झाला त्याने एकही न करता पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुल त्रिपाठीने १९ चेंडूंमध्ये २३ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाड ४४ चेंडूंमध्ये ६३ धावा केल्या. यामध्ये त्यांनी एक षटकार आणि सात चौकार मारले. शिवम दुबे संघासाठी इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आला होता त्याने १० चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. तर रवींद्र जडेजा २२ चेंडूंमध्ये ३२ धावा केल्या आणि नाबाद राहिला. चेन्नई सुपर किंग स्टार महेंद्रसिंग धोनी याने ११ मध्ये १६ धावा केल्या आणि सामना गमावला. त्याने एक षटकार आणि एक चौकार ठोकला, तर चार चेंडूंमध्ये ११ धावा जेमी ओव्हरटनने केल्या.