फोटो सौजन्य - X
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल : चेन्नई आणि राजस्थान यांच्यामध्ये अरुण जेटली मैदानावर सामना पार पडला या सामन्यात राजस्थान रॉयलचे संघाने सिझनचा चौथा विजय नावावर केला आहे आणि या सीझनमधील त्यांचे सामने संपले आहेत. राजस्थान रॉयल्स संघाने अरुण जेटली मैदानावर चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करून या सीझनचा अंत विजयाने केला आहे. राजस्थानने चेन्नईच्या संघाला ६ विकेट्स पराभूत केले आहे. आजचा सामना हा फारच रोमांचक झाला आहे या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
राजस्थान रॉयल्स फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर यशस्वी जयस्वाल यांनी संघासाठी आज 19 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. यामध्ये त्याने दोन षटकार आणि पाच चौकार मारले तर वैभव सूर्यवंशी याने देखील आजचे सामन्यात कमालीची कामगिरी केली. वैभव सूर्यवंशी याने संघासाठी आज अर्धशतक ठोकले त्याने 33 चेंडूंमध्ये 57 धावा केल्या आणि त्याने यामध्ये चार षटकार आणि चार चौकार मारले. संजू सॅमसंग आजच्या सामन्यात 41 धावा करण्यात यशस्वी ठरला.
Rajasthan Royals end the season on a high with a terrific win against Chennai Super Kings. 👏#Cricket #IPL2025 #Sportskeeda #CSKvRR pic.twitter.com/vLRnnxvvkb
— Sportskeeda (@Sportskeeda) May 20, 2025
तर आजच्या सामन्यात ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर या दोघांनी संघासाठी आजच्या सामन्यात फिनिशरची भूमिका निभावली. मागील अनेक सामन्यांमध्ये त्यांना याच्यात अपयश ठरले होते पण त्यांनी आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करून ध्रुव जुरेल याने बारा चेंडूमध्ये 31 धावा केल्या आणि यामध्ये त्यांनी तीन षटकार आणि दोन चौकार मारले. हेटमायर याने आजच्या सामन्यात पाच चेंडू खेळले आणि यामध्ये त्याने 12 धावा केल्या.
चेन्नई गोलंदाजी आज निराशाजनक राहिली आज संघाला फक्त चार विकेट हाती लागले. यामध्ये रविचंद्रन अश्विन याने संघाला दोन विकेट्स मिळवून दिले. यामध्ये त्याने वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसंन या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर नूर अहमद आणि अंशुल कम्बोज या दोघांनी संघासाठी प्रत्येकी एक एक विकेट घेतला.
युद्धवीर सिंग आणि आकाश मधवाल या दोघांनी प्रत्येकी तीन तीन विकेट्स घेतले आणि हे त्यांच्या संघासाठी फायदेशीर ठरले. तुषार देशपांडे यांनी संघाला एक विकेट मिळवून दिला हंसरंगा याने देखील संघाला एक विकेट मिळवून दिला.