दीप्ती शर्माकडे नवा रेकॉर्ड करण्याची संधी (फोटो- ians)
टीम इंडियाची जबरदस्त फिरकीपटू दीप्ती शर्माने पाकिस्तानविरुद्ध आक्रमक गोलंदाजी केली. पहिल्याच सामन्यात तिने ५ विकेट्स घेतल्या. टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी तिने केली आहे. त्यामुळे येत्या सामन्यात दीप्ती शर्माकडे भारताची माजी क्रिकेटपटू झूलन गोस्वामीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड झूलन गोस्वामीच्या नावावर आहे. झूलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३५५ विकेट्स घेतल्या आहेत. हा रेकॉर्ड मोडण्याची संधी दीप्ती शर्माकडे असणार आहे. दीप्ती शर्माने आतापर्यंत ३५४ विकेट्स घेतल्या आहेत. सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी तिला केवळ २ विकेट्सची गरज असणार आहे. तिने २ विकेट्स मिळवताच दीप्ती शर्माच्या नावावर नवा रेकॉर्डची नोंद होणार आहे.
Deepti Sharma: 5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस, T20 सर्वाधिक बळी घेणारी महिला खेळाडू
T20 सर्वाधिक बळी घेणारी महिला खेळाडू
भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरुवात विजयाने केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा ६४ धावांनी पराभव केला. स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माच्या अविस्मरणीय गोलंदाजीने पाकिस्तानवरील भारताच्या प्रभावी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली, ज्यामुळे तिला सामनावीर पुरस्कार मिळाला.
स्मृती मंधानानेही या सामन्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. तिने धडाकेबाज ६८ धावांची खेळी केली. मात्र दीप्ती शर्माच्या झंझावातामुळे पाकिस्तानची महिला टीम मैदानात टिकू शकली नाही आणि भारताने विश्वकपची दणदणीत सुरूवात केली असल्याचे दिसून आले. याशिवाय दीप्तीने वैयक्तिक रेकॉर्डही या सामन्यात केला. दीप्ती शर्माने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १० धावा देत ५ बळी घेतले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वीचा विक्रम झुलन गोस्वामीच्या नावावर होता.






