फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Delhi Capitals batsman Harry Brook banned from IPL : आयपीएल २०२५ ची सुरुवात २२ मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना कोलकाता नाईट राइडर्सचा विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये होणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरुद्ध खेळवला जाणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी एसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम – विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. आता इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये आयपीएल २०२५ सुरू होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला.
इंग्लंडचा स्फोटक फलंदाज हॅरी ब्रूकला यावेळी मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटी रुपयांना खरेदी केले होते. परंतु त्याने सीझन-१८ सुरू होण्यापूर्वी आता त्याने त्याचे नाव मागे घेतले आहे. त्यानंतर हॅरी ब्रुकवर आयपीएलमधून बंदी घालण्यात येणार आहे. वास्तविक, आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंसाठी नियम बनवण्यात आला आहे जर तो नियम खेळाडूने पाळला नाही तर त्यांना बॅन केले जाणार असे स्पष्ट सांगितले होते. आयपीएलमध्ये असा नियम करण्यात आला होता की जो कोणी परदेशी खेळाडू हंगाम सुरू होण्यापूर्वी आपले नाव मागे घेईल त्याला पुढील २ आयपीएल हंगामांसाठी बंदी घातली जाईल.
सोशल मीडियावर हॅरी ब्रूकने एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, “येणाऱ्या आयपीएल सिझनमधून माघार घेण्याचा मी खूप कठीण निर्णय घेतला आहे. मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या समर्थकांची निःसंशयपणे माफी मागतो असे त्याने त्याच्या पत्रामध्ये लिहिले आहे. मला क्रिकेट आवडते मी लहानपणापासूनच माझ्या देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहिले आहे आणि या पातळीवर मला आवडणारा खेळ खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे.
पुढे त्याने लिहिले आहे की, माझ्यावर विश्वास असलेल्या लोकांच्या मार्गदर्शनामुळे, मी या निर्णयाचा गांभीर्याने विचार करण्यासाठी वेळ काढला आहे. इंग्लंड क्रिकेटसाठी हा खरोखरच महत्त्वाचा काळ आहे आणि मी आगामी मालिकेसाठी तयारी करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध होऊ इच्छितो. हे करण्यासाठी, माझ्या कारकिर्दीतील आतापर्यंतच्या सर्वात व्यस्त काळानंतर मला पुन्हा ताजेतवाने होण्यासाठी वेळ हवा आहे. मला माहित आहे की प्रत्येकजण हे समजून घेतील असे नाही आणि मी त्यांच्याकडून अशी अपेक्षा करत नाही, परंतु मला जे योग्य वाटते ते करावे लागेल आणि माझ्या देशासाठी खेळणे हे माझे प्राधान्य आणि लक्ष आहे. मला मिळालेल्या संधी आणि मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी खूप आभारी आहे.
Harry Brook should be banned. No excuse. pic.twitter.com/NHKaArgRpg
— Yash Lahoti (@YvLahoti) March 10, 2025
हॅरी ब्रुकच्या माघारीनंतर सरफराज खानचे नशीब चमकू शकते. यावेळी मेगा लिलावात सरफराज विकला गेला नाही पण आता तो दिल्ली कॅपिटल्समध्ये परतू शकतो. आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने ६ विदेशी खेळाडू आहेत. त्यामुळे आता ब्रूकच्या जागेवर आता भारतीय किंवा विदेशी असा कोणताही खेळाडूला रिप्लेस केले जाऊ शकते. सध्या दिल्ली कॅपिटल्सकडे ६ विदेशी खेळाडू संघामध्ये आहेत त्यामुळे आयपीएलच्या नियमानुसार कमीतकमी ५ विदेशी खेळाडू संघामध्ये असणे गरजेचे आहे. आता यावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ काय निर्णय घेणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.