महेंद्रसिंग धोनी आणि वसीम जाफर(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल 2025च्या 18 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा प्रवास अतिशय निराशाजनक राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्जला आतापर्यंत चारपैकी तीन सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईचा संघ केवळ मुंबईविरुद्धचा सामनाच जिंकू शकला आहे. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सकडून लागोपाठ पराभव पत्करावा लागला आहे.
या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकांनी त्याला निवृत्तीचा सल्ला देखील दिला आहे. वास्तविक पाहता या पराभवासाठी केवळ धोनीलाच जबाबदार धरलं जात नसून सर्वात मोठा दोष हा चेन्नईचा टॉप ऑर्डरमध्ये दिसून येत आहे. ज्याने आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. त्यांच्या सलामीच्या फलंदाजांना भागीदारी करण्यात आणि धावा करण्यात संघर्ष करावा लागत आहे. तसेच धोनीच्या फलंदाजीच्या क्रमवारीवर देखील अनेक शंका घेतल्या जात आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदींनी घेतली 1996 च्या विश्वचषक विजेत्या खेळाडूंची भेट! व्हिडिओ शेअर करत, म्हणाले…; पहा व्हिडिओ
सीएसकेच्या फलंदाजांच्या अपयशानंतर, भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरला म्हटला आहे की, धोनी जर चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत नसेल आणि त्याच पद्धतीने फलंदाजी करत राहिला तर त्यांनी आता तरुण खेळाडूसाठी जागा तयार करायला हवी. जाफरने ESPNcricinfo बोलताना सांगितले की, होय, जर धोनी कर्णधारपद सांभाळत नसेल तर त्याला अशी फलंदाजी करताना पाहून थोडे वाईट वाटते. अशा परिस्थितीत त्याने स्वतः बाहेर पडायला हवे.
मर्यादित क्रिकेट खेळण्याला धोनीच्या संघर्षाचे श्रेय जाफरकडून देण्यात आले. 43 वर्षीय खेळाडूने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आणि आता तो फक्त आयपीएलमध्येच खेळतो. जाफर पुढे म्हणाला की, धोनी जास्त क्रिकेट खेळत नसल्याने त्यामुळे ते सोपे नाही. म्हणूनच तो इतका कमी फलंदाजी करत असतो, पण जेव्हा तुम्ही 10 षटकांत पाच विकेट गमावून बसतात तेव्हा धोनीला फलंदाजी करण्याशिवाय पर्याय उरत नाही.कारण, मागे केवळ अश्विन असतो. निदान धोनीने त्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहून बरे वाटले.
हेही वाचा : SHR vs GT : Washington sundar खरच आऊट होता? थर्ड अंपायरचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात.., पहा व्हिडिओ
जाफर पुढे म्हणाला की, तुमची टॉप ऑर्डर धावा काढत नसते तेव्हा ही सर्वात मोठी काळजी करण्याची गोष्ट आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या शर्यतीत देखील ते आहेत असे वाटत नाही. गेल्या सामन्यात त्यांना 40 धावांनी पराभव पत्करावा लागला होता, यावेळी त्यांचा 25 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ही पूर्वीची चेन्नई नाही. जेव्हा जेव्हा चेन्नई एखाद्या खेळाडूची निवड करते तेव्हा तुम्ही त्याच्याकडून चांगली कामगिरीची अपेक्षा करता. पण यावेळी मात्र, तसे होताना दिसले नाही, मग तो त्रिपाठी असो वा दीपक हुड्डा. ते फॉर्मात नाहीत. सीएसकेला त्यांच्या घरच्या मैदानावर इतकं वाईट खेळताना माझ्या बघण्यात आले नाही.