फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विजय हजारे ट्रॉफी फायनल : विजय हजारे ट्रॉफीचा शेवटचा सामना काल पार पडला. यामध्ये मयंक अग्रवालच्या नेतृत्वाखालील कर्नाटकच्या संघाने शनिवारी अंतिम फेरीत विदर्भाचा पराभव करून पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी जिंकून कमाल केली आहे. कालचा फायनलचा सामना हा मनोरंजक ठरला. फायनलचा सामना विदर्भ आणि कर्नाटक यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. कालच्या सामन्यांमध्ये विदर्भासाठी सलामीवीर ध्रुव शौरेने उत्कृष्ट फॉर्म दाखवत वडोदरात शतक झळकावले. मात्र, त्याचे शतक संघाला मदत करू शकले नाही आणि ३६ धावांनी विजेतेपद गमावले.
दिल्लीच्या या माजी क्रिकेटपटूने यापूर्वी उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत शतके झळकावली होती. अंतिम सामन्यातही त्याने आपला अप्रतिम फॉर्म कायम ठेवला आणि १११ चेंडूत ११० धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत कर्णधार करुण नायरवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या विदर्भ संघाला ३१ चेंडूत केवळ २७ धावा करून वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाच्या गोलंदाजीवर नायर बाद झाल्याने मोठा फटका बसला.
खो खो जागतिक विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सीझनमध्ये पुरुष गटाने अंतिम फेरीत केला प्रवेश
दबाव वाढत असताना शौरीने संधीचा फायदा घेत उत्कृष्ट संयम आणि तंत्राचे प्रदर्शन करत शतक झळकावून आपल्या संघाला सामन्यात कायम राखले. बाद फेरीत चांगली कामगिरी करणं सोपं नसतं, पण मोठ्या सामन्यांमध्ये शतकांची हॅट्ट्रिक झळकावून शोरीने निवडकर्त्यांना आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्याच्या या शतकामुळे त्याला राष्ट्रीय संघातून बोलावणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही.
शनिवारीच बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली, ज्यामध्ये एकाही आश्चर्यकारक नावाचा समावेश नव्हता. ध्रुव शौरीसोबत असे घडण्याची ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा त्याची चमकदार कामगिरी असूनही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यासह, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड असूनही, ध्रुव अशा खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे ज्यांना निवडकर्त्यांकडून अनेकदा दुर्लक्ष केले जाते.
– Hundred in Quarter Final.
– Hundred in Semi Final.
– Hundred in Final.ONE & ONLY DHRUV SHOREY IN VIJAY HAZARE TROPHY 2024-25 🥶 pic.twitter.com/65QA7WFz8j
— Johns. (@CricCrazyJohns) January 18, 2025
शौरीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४६७१ धावा केल्या आहेत. यामध्ये १३ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने लिस्ट ए सामन्यांमध्ये ७२ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर २७१२ धावा आहेत. यामध्ये ६ शतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलच्या २०१८ आणि २०१९ च्या हंगामात शौरी चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग होता. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी त्याने त्याची मूळ किंमत ३० लाख रुपये ठेवली होती, परंतु त्याला कोणताही खरेदीदार सापडला नाही.