फोटो सौजन्य - Delhi Premier League T20
दिल्ली प्रिमियर लीग 2025 चा काल फायनलचा सामना पार पडला. हा सामना वेस्ट दिल्ली लायन्स विरुद्ध सेंट्रल दिल्ली किंग्ज या दोन संघामध्ये खेळवण्यात आला होता. वेस्ट दिल्ली लायन्सने सेंट्रल दिल्ली किंग्जचा पराभव करून दिल्ली प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. कर्णधार नितीश राणाने शानदार अर्धशतकी खेळी केली. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात वेस्ट दिल्ली किंग्जचा ६ विकेट्सने पराभव झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सेंट्रल दिल्ली किंग्जने २० षटकांत ७ गडी गमावून १७३ धावा केल्या. युगल सैनीने ४८ चेंडूंत ६५ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरादाखल वेस्ट दिल्ली लायन्सने १८ षटकांत ४ गडी गमावून १७५ धावा करून सामना जिंकला. या सामन्यात पश्चिम दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात खूपच खराब झाली. युगल सैनीने गड राखला असला तरी दुसऱ्या टोकाकडून विकेट पडतच राहिल्या. प्रांशू विजयरनने ५० धावांची नाबाद खेळी केली.
Hrithik Shokeen finishes it off in style! 🏏
West Delhi Lions have been crowned Champions of the Adani Delhi Premier League 2025! 🏆
West Delhi Lions | Nitish Rana | Delhi Premier League 2025 | #AdaniDPL2025 #DPL2025 #DPL #Delhi #Cricket pic.twitter.com/3GSm58a8Kd
— Delhi Premier League T20 (@DelhiPLT20) August 31, 2025
१७३ धावांच्या प्रत्युत्तरात, वेस्ट दिल्ली लायन्सच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली. ५ षटकांत ४८ धावांवर ३ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर कर्णधार नितीश राणा यांनी जबाबदारी सांभाळली. राणाने ४९ चेंडूत ७९ धावांची नाबाद खेळी केली. यात ७ षटकार आणि ४ चौकारांचा समावेश होता.
नितीश व्यतिरिक्त, ऋतिक शौकीनने २७ चेंडूत ४२ धावांची नाबाद खेळी केली. या जोरावर पश्चिम दिल्लीने केवळ १८ षटकांत १७४ धावांचे लक्ष्य गाठले. पश्चिम दिल्ली लायन्स पहिल्यांदाच दिल्ली प्रीमियर लीगचा विजेता बनला आहे. यापूर्वी, पूर्व दिल्ली रायडर्सने २०२४ मध्ये पहिले विजेतेपद जिंकले होते.
संपूर्ण स्पर्धेत वेस्ट दिल्ली लायन्सचा कर्णधार नितीश राणा याने फलंदाजीने शानदार कामगिरी केली. त्याने ११ सामन्यांमध्ये ६५.५० च्या सरासरीने आणि १८१.९४ च्या स्ट्राईक रेटने ३९३ धावा केल्या. २०२५ च्या डीपीएलमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज होता. अर्पित राणा (४९५), सार्थक रंजन (४४९) आणि यश धुळ (४३५) यांनी नितीश राणापेक्षा जास्त धावा केल्या.
प्रांशुने २४ चेंडूत ५० धावा करून संघाला चांगल्या स्थितीत आणले. सैनीने ४८ चेंडूत ६५ धावा केल्या. युगल आणि प्रांशु व्यतिरिक्त, मध्य दिल्लीकडून आर्यन राणाने २१ धावा केल्या. सिद्धार्थ जून आणि जॉन्टी सिद्धूने १०-१० धावा केल्या. पश्चिम दिल्ली लायन्सकडून मनन भारद्वाज आणि शिवांक वशिष्ठ यांनी २-२ बळी घेतले, तर मयंक गुसैन, शुभम दुबे आणि नितीश राणा यांना १-१ यश मिळाले.