फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कप सुरु व्हायला फक्त 8 दिवस शिल्लक राहिले आहेत, भारताच्या संघाची या स्पर्धेसाठी घोषणा केली होती. संजू सॅमसन याला संघामध्ये स्थान मिळाले होते पण यावेळी सिलेक्टर अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केल्यानंतर सांगितले होते की शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल अनुपस्थित त्याला संधी देण्यात आली आहे. सध्या संजू मागिल काही दिवसांपासून केरळ क्रिकेट लीग खेळत आहे, यामध्ये तो सातत्याने चर्चेत पाहायला मिळाला आहे.
संजू सॅमसन सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे. तो केरळ क्रिकेट लीग (KCL 2025) खेळत आहे आणि कोची ब्लू टायगर्सचा भाग आहे. त्याने आता स्पर्धेत सलग चौथ्यांदा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याचा ‘नो लूक सिक्स’ व्हायरल होत आहे. आशिया कपसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये त्याचे स्थान निश्चित वाटत नव्हते पण आता त्याला दुर्लक्ष करणे कठीण होईल.
केसीएल २०२५ च्या २२ व्या सामन्यात, कोची ब्लू टायगर्सची अॅलेप्पी रिपल्सशी टक्कर झाली. या सामन्यात कोचीला १७७ धावांचे लक्ष्य मिळाले. संजू सॅमसन ओपनिंगला आला आणि त्याने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. सॅमसनने ४१ चेंडूंचा सामना केला आणि २०२.४४ च्या स्ट्राईक रेटने ८३ धावा केल्या. या डावात त्याने ९ षटकार आणि २ चौकार मारले. संजूच्या या खेळीच्या जोरावर, कोची ब्लू टायगर्सने केवळ १८.२ षटकांत लक्ष्याचा यशस्वीपणे पाठलाग केला.
केसीएलचा हा हंगाम संजू सॅमसनसाठी धमाकेदार ठरला आहे. त्याने सलग चौथे अर्धशतक झळकावले आहे. त्याने एरिस कोल्लम सेलर्सविरुद्ध ५१ चेंडूत १२१ धावा केल्या. त्याने त्रिशूर टायटन्सविरुद्ध ४६ चेंडूत ८९ धावा केल्या. त्याने त्रिवेंद्रम रॉयल्सविरुद्धही ६२ धावांची शानदार खेळी केली. आता त्याने अॅलेप्पी रिपल्सविरुद्धही चमत्कार केले आहेत.
Sanju Samson’s sixes resound like thunder across the Greenfield International Stadium ⚡️#KCLSeason2 #KCL2025 pic.twitter.com/liOQ6b5ftF
— Kerala Cricket League (@KCL_t20) August 31, 2025
अॅलेप्पी रिपल्सविरुद्धच्या ८३ धावांच्या या खेळीत सॅमसनने चेंडू हवेत उडवले. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये संजूने चेंडू मारल्यानंतर पुन्हा त्याकडे पाहिले नाही. संजू सॅमसनच्या या नो लूक शॉटचे खूप कौतुक केले जात आहे.
२०२५ च्या आशिया कपमध्ये संजू सॅमसनचे टीम इंडियामध्ये स्थान मिळणे कठीण वाटत होते. शुभमन गिल उपकर्णधार म्हणून संघात परतत आहे. त्यामुळे संजू सलामीवीराची जागा गमावेल असे वाटत होते. तथापि, सॅमसनने सलग तिसरे अर्धशतक झळकावून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे.