गौतम गंभीर आणि अभिषेक नायर(फोटो-सोशल मिडिया)
BCCI : भारतात सध्या आयपीएल २०२५ चा थरार सुरू आहे. १८ व्या हंगामात आतापर्यंत ३२ सामने खेळवण्यात आले आहेत. अशातच भारतीय क्रिकेटमधून एक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटशी संबंधित असलेल्या ३ जणांना बीसीसीआयकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळण्यात आलेल्या पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाचा 1-3 असा दारुण पराभव झाला होता. या पराभवानंतर आणि मालिकेदरम्यान ड्रेसिंग रूममधील काही बाबी आता समोर आल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठी कारवाई केली आहे.
भारतीय संघाची गेल्या काही महिन्यातील कामगिरी लक्षवेधक राहिली आहे. भारताने नुकतीच दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दाखवली आहे. असे असताना देखील अवघ्या 8 महिन्यांच्या कार्यकाळानंतर बीसीसीआयने सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांना निरोप दिला असल्याची माहिती समोर आली आहे. अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे.
हेही वाचा : PSL 2025 : पाकिस्तान सुपर लीगसमोर आयपीएल गरीब? पाक क्रिकेट कमावतोय जास्त पैसा, वाचा सविस्तर..
भाराताचा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेत ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. त्या मालिकेनंतर झालेल्या आढावा बैठकीत, संघ व्यवस्थापनातील एका सदस्याकडून बीसीसीआयकडे ड्रेसिंग रूममधील लीकबद्दल तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर बीसीसीआयने अभिषेक नायर यांच्यासोबतच भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि प्रशिक्षक सोहम देसाई यांना देखील पदमुक्त केले असल्याची माहिती दैनिक जागरणच्या रिपोर्टमधून समोर आली आहे.
हेही वाचा : IPL २०२५ : Rishabh Pant सेनेसाठी आनंदाची बातमी! एलएसजी संघात ‘या’ तेजतर्रार गोलंदाजाची एंट्री! पहा VIDEO
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या गौतम गंभीरचा खास माणूस असलेल्या अभिषेक नायरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे आता मोठी खळबळ माजली आहे. अशातच आता गौतम गंभीरने या सर्व प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सीतांशु कोटक हे टीम इंडियाशी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून जोडलेले असून टी. दिलीपचे काम सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डेस्केट पाहणार आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये काल थरारक सामना पार पडला. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली संघाने ५ गडी गमावून १८८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सनेही ४ विकेट गमावत १८८ धावा केल्या आणि सामना बरोबरीत आणला आणि सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हरमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने दोन गडी गमावून पाच चेंडूत ११ धावा केल्या होत्या. दिल्लीने राजस्थानचे १२ धावांचे आव्हान चार चेंडूतच पूर्ण करुण विजय मिळवला.