द्वारकानाथ संझगिरी (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम)
द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन : भारतामधील लोकप्रिय क्रिकेट विश्वातील समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे मुंबईमधील लीलावती रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी वयाच्या ७४ वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांची ५० वर्ष स्तंभलेखक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता आणि संगीत कार्यक्रमाचे सादरकर्ते म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख बनवली आहे.
द्वारकानाथ संझगिरी हे पेशानं सिव्हिल इंजिनिअर होते, त्यामुळे ते सुरुवातीच्या काळात मुंबई महानगरपालिकेमध्ये (Mumbai Municipal Corporation) नोकरी करत होते. त्यांना क्रिकेटमध्ये आवड असल्यामुळे क्रिकेट आणि मराठी साहित्याविषयी त्यांचा अभ्यास मजबूत होता. द्वारकानाथ संझगिरी म्हणजे क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील किश्श्यांची मैफिल असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. पण आता त्यांच्या निधनाने मात्र ही मैफल अर्ध्यावर सोडून संझगिरींनी चाहत्यांना आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का दिला आहे. द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांमध्ये काम करत आहे. संझगिरी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते २००८ या वर्षी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले.
स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी यांनी आपला ठसा उमटवला आहे. १९७० च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द द्वारकानाथ संझगिरी यांनी सुरू करून केली होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले आहे. टीम इंडियाने १९८३ मध्ये विश्वचषक नावावर केला होता. या विश्वचषकानंतर त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले, यावेळी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले होते.
Extremely saddened to hear of the passing of Dwarkanath Sanzgiri. A friend of 38 years, so many shared memories and someone who wrote with so much beauty and style and colour. You visualised things when he wrote about them. What a fight against the forces that threatened to take…
— Harsha Bhogle (@bhogleharsha) February 6, 2025
द्वारकानाथ संझगिरी यांनी क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांच्यावर खास एक पुस्तक लिहिले आहे, त्याचबरोबर अनेक बॉलीवूड त्याचबरोबर आशाताई यांच्यावर देखील विशेष लिखाण लिहिले आहे. क्रिकेटवर त्याचे प्रेम असल्यामुळे त्यांची क्रिकेटवर अनेक पुस्तकांमध्ये लिखाण केले आहे.
खेलंदाजी, आम्हां वगळा, वेदनेचे गाणे, संवाद लेजेंडशी, थीमच्या किनाऱ्यावरुण, देव आनंद : के दिल अभी भरा नहीं, शतकांत एकच सचिन, क्रिकेट कॉकटेल, वल्ली आणि वल्ली, अश्रूं आणि षटकार, जिन अँड टॉनिक, शाम्पेन क्रिकेट, फाळणीच्या देशात, फिरता फिरता, दादर – एक पिनाकोलाडा, अफलातून अवलिये, खुल्लम खिल्ली, प्यार का राग सुनो : देवआनंद ते शाहरुख खान एक रोमँटिक प्रवास, माझी बाहेरख्याली, वो भुली दास्तॉं…,आशा एक सुरेल झंझावात, इंग्लिश ब्रेकफास्ट, ब्लु लगून