फोटो सौजन्य - IndianPremierLeague
इंग्लंडमध्ये IPL 2025 : भारतामध्ये सुरु असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे सध्या आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सामन्यादरम्यान गोळीबार झाल्यामुळे सामना त्याचवेळी रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दोन्ही संघांमधील सर्व खेळाडूंना त्याचबरोबर स्टाफला ट्रेनने ठिकाणावरून हलवण्यात आले होते. सध्या आयपीएल २०२५ चे १६ सामने शिल्लक आहेत. आता आयपीएल २०२५ च्या उर्वरित सामान्यांसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. आता हे सामने कुठे खेळवले जाणार यासंदर्भात प्रश्नचिन्ह आहे.
आता सूत्रांच्या माहितीनुसार असे सांगण्यात येत आहे की, आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने हे इंग्लडमध्ये खेळवले जाणार आहेत असे म्हंटले जात आहे. सोशल मीडियावर एका युझरने लिहिले आहे की, इंग्लंडमध्ये क्रिकेट हंगाम सुरू झाला आहे, त्यामुळे उर्वरित आयपीएल सामन्यांसाठी इंग्लंडचा विचार केला जात आहे. भारतीय प्रेक्षकांच्या वेळेनुसार हवामान ३.३० आणि ७.३० वाजता सुरू होण्यासाठी ती योग्य वेळ आहे.
England is being considered for the possible venue for remaining IPL matches as the Cricket season has begun in England the weather is perfect there for 3.30 and 7.30 PM starts as it absolutely matches Indian Audiences’ timings. #IPL2025
Via Sports Tak pic.twitter.com/sjXRQJWStn
— Abhijeet ♞ (@TheYorkerBall) May 9, 2025
एवढेच नव्हे तर क्रिकेट संदर्भात माहिती शेअर करणारे X युझर Johns याने सोशल मीडियावर शेअर केले आहे , इंग्लंडमध्ये आयपीएल इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएल २०२५ इंग्लंडमध्ये पूर्ण करण्यासाठी संभाव्य व्यवस्था करण्याची ऑफर दिली आहे.
🚨 IPL IN ENGLAND 🚨
England Cricket Board has offered BCCI a possible arrange to complete the IPL 2025 in England. [The Cricketer] pic.twitter.com/us6xY2mHay
— Johns. (@CricCrazyJohns) May 9, 2025
भारतीय नियामक मंडळाने यासंदर्भात अजुनपर्यत अधिकृत माहिती दिलेली नाही. भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे त्यामुळे टीम इंडियासाठी आयपीएलचे उर्वरित सामने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएल २०२५ एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सीमेवर बिघडत चाललेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल.
त्याचबरोबर पाकिस्तान सुपर लीगसाठी युएईला विचारले होते पण त्यांना नाकारले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानने आधीच घोषणा केली होती की पीएसएल यूएईमध्ये होईल. त्याचबरोबर आयपीएल २०२५ चे आयोजन युएईमध्ये केले जाणार अशी चर्चा सध्या सुरु आहे.