फोटो सौजन्य - X (PCA)
इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्याचा अहवाल : इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सध्या टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडीजचा संघ इंग्लड दौऱ्यावर आहे. भारताचा संघ 20 जूनपासुन कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे, त्याआधी इंग्लडचा संघ वेस्ट इंडीजविरुद्ध मालिका खेळत आहे. इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये 3 सामन्याची कसोटी मालिका पार पडली या मालिकेत इंग्लडच्या संघाने कसोटी मालिका एकतर्फी जिंकली आणि दणदणीत विजय मिळवुन दिला. यापूर्वी इंग्लंडने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा व्हाईटवॉश केला होता.
आता इंग्लड आणि वेस्ट इंडीज या मालिकेचा पहिला सामना काल म्हणजेच 6 जून रोजी पार पडला. इंग्लड विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये झालेल्या टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात खेळाडूंची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा. कालच्या सामन्यामध्ये इंग्लडचा अनुभवी खेळाडू जोस बटरल याने संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. आता इंग्लंड संघाने टी-२० मालिकेची सुरुवात दमदार पद्धतीने केली आहे. या सामन्यात जोस बटलरने एक अद्भुत खेळी केली. त्याचे शतक हुकले, पण त्याने संघाला चांगल्या स्थितीत आणले होते आणि इंग्लडच्या संघाने 21 धावांनी विजय मिळवुन मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
इंग्लड संघाचे कर्णधारपद हे हॅरि ब्रुककडे सोपवण्यात आले आहे. त्याने कालच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकुन पहिले फलंदाजी करण्याची निर्णय घेतला होता. इंग्लडच्या संघाने पहिला विकेट लवकर गमावला. बेन डकेट हा दुसऱ्या षटकामध्ये बाद झाला आणि संघाने पहिला विकेट गमावला. पहिले फलंदाजी करत इंग्लडच्या संघाने 6 विकेट्स गमावुन 188 धावा केल्या होत्या. त्याच्या प्रतित्युरात वेस्ट इंडीजच्या संघाने 20 ओव्हरमध्ये 167 धावा केल्या आणि 9 विकेट्स गमावले.
The PERFECT start to the series 👌
Victory in Durham ✅
Game two in Bristol 🔜Match Centre: https://t.co/LDkylcYeB5 pic.twitter.com/Mc56WuXDBJ
— England Cricket (@englandcricket) June 6, 2025
इंग्लडच्या संघासाठी जोस बटलर याने धुव्वाधार खेळी खेळली. त्याने 59 चेंडुमध्ये 96 धावा केल्या आणि अल्लजारी जोसेफ याने त्याला बाद केले, त्याचे 4 धावांना विकेट गमावली. या खेळीमध्ये जोस बटलर याने 4 षटकार आणि 6 चौकार मारले. त्याच्या खेळीने इंग्लडला मजबुत स्थितीमध्ये उभे केले.
जेमी स्मिथ याने संघासाठी 38 धावांची खेळी खेळली, तर जोकोब बेथल याने कालच्या सामन्यात 23 धावा केल्या. इतर सर्व फलंदाज हे सिंगल डीजीटमध्ये बाद झाले.