फोटो सौजन्य - Afghanistan Cricket Board सोशल मीडिया
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेटेड पॉइंट्स टेबल : काल अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा स,सामना झाला. या स्पर्धेमध्ये आता अफगाणिस्तानच्या संघाने पुन्हा एकदा खेळ बदलला आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर, जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. इंग्लंड हा चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणारा तिसरा संघ ठरला आहे. याआधी पाकिस्तान आणि बांगलादेश स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये एकूण ८ संघ सहभागी होत आहेत, ज्यामध्ये आतापर्यंत न्यूझीलंड आणि भारताला सेमीफायनलचे तिकीट मिळाले आहे, तर उर्वरित दोन स्थानांसाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत सुरू आहे.
या स्पर्धेची सुरुवात अफगाणिस्तानसाठी चांगली झाली नाही कारण त्यांना त्यांच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोठा पराभव पत्करावा लागला. तथापि, इंग्लंडला हरवून त्यांनी आता उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला जिवंत ठेवले आहे. अफगाणिस्तान संघ २ गुणांसह ग्रुप-ब च्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचा नेट रन रेट -०.९९० आहे. तर ग्रुप बी मध्ये पहिल्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे, दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघाचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता त्यामुळे दोन्ही संघाला १-१ गुण देण्यात आला होता.
𝐀𝐅𝐆𝐇𝐀𝐍𝐈𝐒𝐓𝐀𝐍 𝐁𝐄𝐀𝐓 𝐄𝐍𝐆𝐋𝐀𝐍𝐃! 🙌
Afghanistan has successfully defended their total and defeated England by 8 runs to register their first-ever victory in the ICC Champions Trophy. 🤩
This marks Afghanistan’s second consecutive victory over England in ICC… pic.twitter.com/wHfxnuZiPc
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) February 26, 2025
आता अफगाणिस्तानचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी अफगाणिस्तानला पुढील सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवावे लागेल. जर सामना पावसामुळे वाया गेला तर ऑस्ट्रेलिया बाद फेरीत पोहोचेल कारण त्यांच्या खात्यात आधीच तीन गुण आहेत. तुम्हाला सांगतो की, ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळे वाया गेला होता. ग्रुप बीची पॉईंट टेबलमधील स्थिती फारच मनोरंजक आहे, गुणतालिकेवर नजर टाकली तर दक्षिण आफ्रिकेचा संघ सेमीफायनलमध्ये रन रेटमुळे उपांत्य फेरीमध्ये जाणार आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सेमीफायनलची शर्यत सुरु आहे.
जर आपण ग्रुप अ च्या पॉइंट्स टेबलवर एक नजर टाकली तर, या ग्रुपमधून भारत आणि न्यूझीलंड संघ आधीच सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. या दोन्ही संघांनी त्यांचे पहिले दोन सामने जिंकून बाद फेरीत प्रवेश केला, तर पाकिस्तान आणि बांगलादेश हे संघ स्पर्धेतून बाहेर पडले. या दोन्ही संघांचे खातेही अद्याप उघडलेले नाही. ग्रुप अ मधील शेवटचे दोन सामने म्हणजे भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हे आता फक्त औपचारिकता राहिले आहेत.