सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मिडीया)
MI vs KKR : काल 31 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरवर 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाने मुंबईने आयपीएल 2025 च्या 18 हंगामातील पहिला विजय आपल्या नावे केला आहे. या सामन्यात गोलंदाज पदार्पणवीर अश्विनी कुमारने टिच्चून गोलंदाजी करत 3 ओव्हर मध्ये 24 धावा देत 4 बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासामध्ये पदार्पणात 4 विकेट घेणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत केवळ 116 धावाच केल्या, त्यानंतर मुंबईने हे लक्ष्य 12.5 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात सूर्यकुमार यादवने एक मोठा विक्रम केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा करणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा फलंदाज बनला आहे. सूर्या आता विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.
तसेच सूर्यकुमार यादव चेंडू खेळण्याच्या बाबतीत मात्र सर्वात जलद 8000 धावा करणारा जगातील केवळ दुसरा आणि भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादवने 5256 चेंडूंचा सामना करत 8000 टी-20 धावांचा टप्पा गाठला आहे. 4749 चेंडूत 8000 धावा करणाऱ्या आंद्रे रसेलनंतर अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसराच वेगवान फलंदाज ठरला आहे. केकेआरविरुद्ध खेळताना सूर्यकुमारने 9 चेंडूत नाबाद 27 धावा केलंय. या खेळी दरम्यान ही कामगिरी केली.
हेही वाचा : MI vs KKR : 30 रुपये ऑटो भाडे ते 30 लाख मिळाली किंमत, अश्वनी कुमारच्या वडिलांनी सांगितली सारी हकिकत..
केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून सूर्यकुमार यादवने केवळ 9 चेंडूत 27 धावांची वेगवान खेळी केली होती. आपल्या तडाखेबंद खेळीत सूर्याने असे अनेक फटके टोळवले ज्याचा निखळ आनंद चाहत्यांनी घेतला. सूर्याने 27 धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकार लागवले. याशिवाय मुंबईकडून रायन रिकेल्टनने 41 चेंडूत 62 धावांची नाबाद महत्वाची खेळी केली. या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत केवळ 116 धावाच केल्या, त्यानंतर मुंबईने हे लक्ष्य 12.5 षटकात 2 गडी गमावून पूर्ण केले. पदार्पणवीर अश्विनी कुमारने प्रभावी मारा करत 3 ओव्हर मध्ये 24 धावा देत 4 बळी घेतले. आयपीएलच्या इतिहासामध्ये पदार्पणात 4 विकेट घेणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे.