RCB चे गुजरात जायंट्ससमोर 179 धावांचे लक्ष्य(फोटो-सोशल मीडिया)
GG vs RCB, WPL 2026 LIVE : आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीग २०२६ मधील १२ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या आरसीबीने प्रथम फलंदाजी करत गौतमी नाईकच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ६ गडी गमावून १७८ धावा केल्या आहेत. गुजरातला जिंकण्यासाठी १७९ धावा कराव्या लागणार आहेत. गुजरात जायंट्सकडून काशवी गौतमने २ विकेट्स घेतल्या.
महिला प्रीमियर लीग २०२६ मधील १२ व्या सामन्यातगुजरात जायंट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. स्मृती मानधनासोबत डावाची सुरुवात करणारी ग्रेस हॅरिस पहिल्याच ओव्हरमध्ये १ धाव करून बाद झाली. तिला रेणुका सिंगने बाद केले. त्यानंतर आलेली जॉर्जिया वॉल देखील १ धावेवर काशवी गौतमीची शिकार ठरली. त्यानंतर आलेली गौतमी नाईकने स्मृती मानधनासोबत भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. या दोघींनी ५८ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मानधना २३ चेंडूत २६ धावा करून बाद झाली. त्यानंतर ऋचा घोष आणि नाईकने छोटी भागीदारी केली. दरम्यान गौतमीने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघींनी ६९ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली.
दरम्यान, ऋचा घोष २० चेंडूत २७ धावा करून बाद झाली. तिला सोफी डिव्हाईनने माघारी पाठवले. त्यानंतर गौतमी नाईक ५५ चेंडूत ७३ धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत ७ चौकर आणि १ षटकार लगावला. तिला ॲशले गार्डनरने माघारी पाठवले. त्यानंतर नादिन डी क्लर्क ४ धावा, राधा यादव १७ धावा करून बाद झाल्या तर श्रेयांका पाटील ८ धावा करून नाबाद राहिली. गुजरात जायंट्सकडून काशवी गौतम आणि ॲशले गार्डनर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर रेणुका सिंग ठाकूर आणि सोफी डिव्हाईन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Innings Break! Useful contributions from the batters propel #RCB to 1️⃣7️⃣8️⃣ 🎯 Can they make it a perfect 5⃣ or will #GG chase it down? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/KAjH515c64 #TATAWPL | #KhelEmotionKa | #GGvRCB pic.twitter.com/1NsCun3jTk — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 19, 2026
गुजरात जायंट्स:बेथ मूनी (यष्टीरक्षक), सोफी डिव्हाईन, अनुष्का शर्मा, कनिका आहुजा, ॲशले गार्डनर (कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, काश्वी गौतम, भारती फुलमाळी, तनुजा कंवर, हॅपी कुमारी, रेणुका सिंग ठाकूर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (डब्ल्यू), गौतमी नाईक, नादिन डी क्लर्क, राधा यादव, प्रेमा रावत, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, लॉरेन बेल






