काहीच दिवसांपूर्वी बर्लिंगहम येथे पारपडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games 2022) भारताच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. याच स्पर्धेत भारताचे टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला या दोघांनी मिश्र दुहेरीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
Telangana | #CommonwealthGames2022 Table Tennis gold medal winner Sreeja Akula gets a grand welcome at the Hyderabad airport as she arrives from Birmingham, UK (10.08) pic.twitter.com/8PcjNBkEcY
— ANI (@ANI) August 10, 2022
या स्पर्धेत दमदार कामगिरी करून श्रीजा अकुला बुधवारी भारतात परतली त्यावेळी हैदराबादच्या विमानतळावर तिचे जंगी स्वागत करण्यात आले. राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर प्रथमच हैदराबादच्या शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या श्रीजा अकुलाने (Sreeja Akula) तेलंगणाचे क्रीडा मंत्री व्ही श्रीनिवास गौड यांनी स्वागत केले.
यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना श्रीजा म्हणाली “भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदक जिंकल्यामुळं मी माझ्या यशाबद्दल खूप आनंदी आहे. आमच्या असोसिएशनला मदत केल्याबद्दल मी सीएम केसीआर, केटीआर आणि क्रीडा मंत्री यांची खूप आभारी आहे. त्यांच्या मदतीमुळेच मला यश मिळाल आहे. मला प्रशिक्षण देणाऱ्या तेलंगणा सरकार आणि माझ्या प्रशिक्षकाची मी आभार आहे.”
बर्मिंगहॅम येथील पारपडलेल्या स्पर्धेत टेबल टेनिसच्या मिश्र दुहेरी प्रकारात अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी मलेशियाच्या चुंग जावेन आणि लीन कारेन यांचा ११-४, ९-११, ११-५, ११-६ असा पराभव केला होता.