फोटो सौजन्य - युट्युब चॅनेल
हरभजन सिंह : भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची तयारी करत आहे. परंतु आता स्पष्ट झाले आहे की, रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाप झाल्यामुळे तो सध्या टीम इंडियाचा भाग नसणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या सामन्यांमध्ये खेळणार नाही त्यामुळे टीम इंडियाचे कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवले जाणार आहे. या बातमीनंतर आता रोहित शर्माच्या कर्णधार पदावर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांची वक्तव्य केले आहेत. भारताचा माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी सुचवले की, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा कर्णधार एकच असावा. रोहित शर्मा मधल्या मालिकेत आला तर त्याने फक्त फलंदाज म्हणून खेळावे, असे त्यांनी सांगितले होते.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
आता भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्पर्धेमधील कर्णधारपदावर प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याने बीसीसीआयला खडसावले आहे त्याचबरोबर अनेक मोठे खुलासे केले आहेत. जतीन सप्रूच्या यूट्यूब चॅनलवर हरभजन सिंग म्हणाला, “मला वाटतं, जर तुम्ही पहिले दोन कसोटी सामने जिंकलात तर संपूर्ण भारत म्हणेल जसप्रीतला एकटे सोडा आणि जर ते दोन्ही कसोटी सामने हरले तर ते म्हणतील रोहितला परत आणा. आम्हाला माघारी फिरण्याची खूप घाई झाली आहे, मी सनी (सुनील गावस्कर) सरांबद्दल बोलत नाहीये… मी इथल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल बोलत आहे ज्याला क्रिकेट समजते.”
तो पुढे म्हणाला, “त्याची (सुनील गावसकर) सूचना अशी आहे की संपूर्ण मालिकेसाठी कर्णधार सारखाच राहिला पाहिजे, ही एक चांगली सूचना आहे. तसे झाले तर बरे, पण जर तसे घडत नसेल आणि मालिकेच्या मध्यभागी तुम्ही बदलत असाल आणि नंतर तुम्ही हरलात तर कोणीही प्रश्न करणार नाही. रोहित शर्मा येताच सामना जिंकला आणि हरला, पुढच्या वेळी वेगळे वातावरण असेल. जर भारताने चांगली सुरुवात केली तर संपूर्ण मालिकेसाठी जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवणे हा वाईट पर्याय नाही. जसप्रीतकडे असे मन आहे की तो संघाचे नेतृत्व करू शकतो. बुमराह हरला तर लोक म्हणतील रोहितला आणा आणि रोहित हरला तर लोक म्हणतील विराटला आणा.
न्यूझीलंडविरुद्ध व्हाईटवॉश झाल्यानंतर काही अहवाल समोर आले होते, ज्यात असे म्हटले होते की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या कोचिंगमध्ये संघाने चांगली कामगिरी केली नाही तर त्याच्याकडून कसोटी संघाचे कोचिंग काढून घेतले जाऊ शकते. काही अहवालांमध्ये असाही दावा करण्यात आला होता की, गंभीर आणि संघातील वरिष्ठ सदस्य विकेटच्या निवडीबाबत एकमत नव्हते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया दौरा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.