भारत ऑस्ट्रेलियाचा अंतिम सामना (India Australia World cup Final) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी पार पडला. भारताला विश्वकप मिळवता नाही आला पण सामन्या दरम्यान अशा अनेक घटना किस्से घडले ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. मॅचमध्ये भारतीय टीमला सपोर्ट करण्यासाठी क्रिकेटर्सच्या बायकाही तिथे हजर आहेत, ज्यामध्ये विराट कोहलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ते केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टीही उपस्थित होती. यावेळी कॉमेंट्री करत असलेल्या हरभजन सिंग त्यांच्याबद्ल असं काही वक्तव्य केलं की, त्याला आता प्रचंड ट्रोल (Harbhajan Singh comment on Athiya and Anushka Sharma) करण्यात येत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात हरभजन सिंग कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंट्री करत होता. यावेळी अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीला स्क्रीनवर दाखवण्यता आलं. तेव्हा हरभजन सिंगने त्यांच्यावर कमेंट करत म्हटले, हे दोघे एकमेकांशी काय बोलत असतील? मला वाटत नाही की तिला क्रिकेटची फारशी समज आहे, त्यामुळे ती फक्त बॉलिवूडबद्दलच बोलत असावी. हरभजन सिंगचं हे वक्तव्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि लोक त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत.
हरभजन सिंगने अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीबद्दल केलेलं वक्तव्य नेटिझन्सना आवडलेलं नाही. सोशल मीडियावर लोकांनी हरभजनला चांगलंच सुनावलं. एका यूजरने लिहिले – आजही कुठेतरी आपल्या समाजात लोक मुलींबद्दल विचार करतात की त्यांना क्रिकेटचे जास्त ज्ञान नाही. त्याचप्रमाणे अनेक युजर्सनी हरभजन सिंगला ट्रोल केले, तर कोणी याला फक्त मस्करी म्हटलं आहे.