रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांनी डान्स केला(फोटो-सोशल मीडिया)
Rohit Sharma and Ritika Sajdeh danced : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यानंतर खेळाडू मिळालेल्या वेळेचा चांगल्यात चांगला वापर करताना दिसत आहेत. कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतलेला भारताचा स्टार खेळाडू ‘हिटमॅन’ रोहित शर्मा सध्या क्रिकेटपासून दूर आहे. रोहित शर्मा २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याने कोणताही आंतरराष्ट्रीय सामना किंवा मालिका खेळलेली नाही. त्याचे कारण म्हणजे त्याने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता तो फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येचे खेळताना दिसणार आहे. अशातच रोहित शर्मा त्याची पत्नी रितिकासोबत नाचताना दिसून आला आहे. या दोघांचा एक व्हिडीओ सद्या खूप व्हायरल होत आहे.
हेही वाचा : संजू सॅमसनला Asia Cup 2025 साठी भारतीय संघात स्थान नाही! ‘त्या’ एका कारणाने आली ही वेळ…
रोहित शर्मा पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्यामागील कारण म्हणजे तो करत असलेला डान्स हे आहे. हो, रोहितने त्याच्या डान्स मूव्हजने त्याच्या कोट्यवधी चाहत्यांची मनावर राज्य केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये रोहित त्याची पत्नी रितिकासोबत नाचताना दिसून येत हे. या दरम्यान, दोन व्हिडिओ दिसत असून एक त्याच्या डान्स सरावाचा आहे, तर दुसरा एखाद्या कार्यक्रमाचा आहे.
रोहित शर्माने त्याची पत्नी रितिका सजदेहच्या भावाच्या लग्नात हा डान्स करताना दिसले आहेत. यादरम्यान, या जोडप्यासोबत आणखी एक महिला देखील दिसत आहे. चौकशी केल्यानंतर असे दिसून आले की, हा व्हिडिओ २०२३ सालचा आहे. रोहित-रितिकासोबत नाचणारी दुसरी महिला ही नवरील आहे. हा व्हिडिओ खास ठरतो कारण सराव आणि कार्यक्रमाचा व्हिडिओ एकत्र पोस्ट केला गेला आहे. यादरम्यान, तिथे बसलेले सर्व लोक रोहितच्या डान्सचा आनंद घेत आहेत.
Rohit Sharma and Ritika bhabhi from practicing dance at home to dancing on stage during Ritika’s brother wedding.🔥❤️ pic.twitter.com/xfSQ5mE3JG
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 13, 2025
रोहित शर्माने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यादरम्यान त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना खेळला आहे. तेव्हापासून तो टीम इंडियासाठी मैदानात उत्तरेला नाही. त्याच वेळी, इंग्लंड मालिकेपूर्वी त्याने अचानक निवृत्तीची घोषणा करून सर्वांना धक्का दिला. तसेच आता रोहित शर्मा आणि बीसीसीआयमधील वाढत्या अंतरावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.
हेही वाचा : IND Vs ENG : ‘माझ्यावर जास्त विश्वास….’ आकाश दीपकडून प्रशिक्षकाचे तोंडभरून कौतुक
अलीकडेच रोहित शर्माचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये त्याचे पोट खूप बाहेर आलेले दिसत होते. अशा परिस्थितीत, टीकाकारांनी त्याच्यावर तोफ डागत म्हणाले की, तो एकदिवसीय क्रिकेटपासून स्वतःला दूर ठेवू शकतो. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर रोहित या फॉरमॅटचा देखील निरोप घेऊ शकतो. आता हे पाहायचे आहे की रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर निवृत्त घेणार की २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत संघात थांबणार आहे.