मुंबई : शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी कोची येथे IPL 2023 साठी मिनी ऑक्शन पारपडला. या ऑक्शनमध्ये इंग्लंडचा खेळाडू सॅम करनला पंजाब किंग्सने 18.50 कोटीला खरेदी केले. या ऑक्शननंतर सॅम करन हा IPL च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. यानंतर सॅम करनने मीडियाला प्रतिक्रिया दिली असून हा लिलाव आणि त्यात त्याच्यावर लागणारी बोली ही अविश्वसनीय होती असे त्याने म्हंटले आहे.
सॅम करनसाठी (Sam Curran) राजस्थान आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस निर्माण झाली होती. राजस्थान 11 कोटीपर्यंत पोहचल्यानंतर सीएसकेने लिलावात उडी घेतली. मात्र लिलाव रंगात आला असताना पंजाब किंग्जने लिलावात उडी घेत सॅम करनला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू केले. मुंबईनेही बोली लावत सॅमचा भाव वाढवला. अखेर पंजाबने 18.50 कोटीला सॅम करनला खरेदी केले.
स्टार स्पोर्ट्स-शो क्रिकेट लाइव्ह ऑक्शन स्पेशलमध्ये बोलताना सॅम करन म्हणाला, काल रात्री मी जास्त झोपलो नाही, थोडा उत्साही होतो, तसेच लिलाव कसा होईल याबद्दल चिंताग्रस्त होतो. पण होय मी जे काही केले ते साध्य करण्यात मी यशस्वी झालो हे पूर्णपणे भारावून गेलो आणि अविश्वसनीयपणे नम्र झाले. मला ते मिळण्याची आशा कधीच नव्हती.
पंजाब संघात गेल्याचा आनंद :
यापूर्वीही पंजाब संघाचा भाग असलेला अष्टपैलू खेळाडू सॅम करन म्हणाला की, जुन्या संघात पुनरागमन करणे खूप चांगले होईल. हे सर्व माझ्यासाठी आयपीएलमध्ये पंजाबसह सुरू झाले, जिथे मी चार वर्षांपूर्वी माझा पदार्पण हंगाम केला होता. म्हणून तिथे परत येणे खूप छान आहे आणि मी माझ्या काही इंग्लिश संघसहकाऱ्यांशी देखील दुवा साधण्यास उत्सुक आहे.