फोटो सौजन्य - सोशल मीडिया
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद आता संपला आहे. २०२५ फेब्रुवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे, यंदा चॅम्पियन ट्रॉफीचे ठिकाण कोणते असणार यावरून मोठा वाद पाहायला मिळाला. आता चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक अधिकृतपणे अजूनपर्यत जाहीर केले नाही परंतु सर्व काही आता निश्चित झालं आहे. त्याचबरोबर भारत विरुद्ध पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ सामन्याबाबत सर्व काही निश्चित झाले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डने ही आयसीसी स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्यास तयार आहे.
दरम्यान, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख, ठिकाण आणि इतर गोष्टी निश्चित झाल्याची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी आणि स्पर्धेचे यजमान पीसीबी यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा करणे बाकी आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवली जाणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत हायब्रीड मॉडेल अंतर्गत पाकिस्तान आणि UAE मध्ये खेळवली जाणार आहे.
सर्वाधिक सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत, तर भारताचे तीन साखळी सामने, एक उपांत्य आणि अंतिम सामना दुबई, यूएई येथे होणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान लीग फेजचा सामनाही होणार आहे. हा सामना रविवारी २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान याआधी दुबईत आशिया चषक आणि विश्वचषक सामने खेळले आहेत.
ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानमध्ये शेख नह्यान अल मुबारक यांची भेट घेतली, जे यूएईचे मंत्री आणि अमिराती क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आहेत. नक्वी आणि मुबारक यांनी मिळून त्याला अंतिम स्वरूप दिले आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. पीसीबीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तटस्थ ठिकाण म्हणून यूएईची निवड केली आहे, असे पीसीबीचे प्रवक्ते आमिर मीर यांनी सांगितले.
भारत आणि पाकिस्तान युएईमध्ये त्यांचे साखळी सामने खेळणार आहेत, तर भारताला गट टप्प्यात बांगलादेश आणि न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. भारताचा सामना २० फेब्रुवारीला बांगलादेश आणि २ मार्चला न्यूझीलंडशी होणार आहे. २३ फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान असा मोठा सामना होणार आहे. भारत आपले सर्व सामने UAE मध्ये खेळणार आहे आणि पाकिस्तानला त्याच्या भूमीवर दोन साखळी सामने खेळायचे आहेत. एक सेमीफायनल पाकिस्तानमध्ये आणि एक सेमीफायनल यूएईमध्ये खेळली जाऊ शकते. याशिवाय जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला तर अंतिम सामना देखील यूएईमध्ये खेळवला जाईल आणि जर भारत बाहेर पडला तर अंतिम सामना लाहोरला हलवला जाऊ शकतो.