Sri Lanka Team (Photo Credit- X)
झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात नुकत्याच झालेल्या दोन वनडे सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेने यजमान झिम्बाब्वेला २-० ने पराभूत करून मालिका जिंकली. मात्र, हा विजय साजरा करण्यापूर्वीच श्रीलंकेच्या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोठा झटका दिला आहे. ‘स्लो ओव्हर रेट’ च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल ICC ने संघातील सर्व ११ खेळाडूंना कठोर शिक्षा सुनावली आहे. या खेळाडूंनी ही शिक्षा स्वीकारली आहे.
पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने ७ धावांनी विजय मिळवला होता. मात्र याच सामन्यात श्रीलंकेच्या खेळाडूंनी ‘स्लो ओव्हर रेट’ नियमाचे उल्लंघन केले. त्यांनी निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकले. त्यामुळे, ICC ने त्यांच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ नुसार श्रीलंका क्रिकेट संघाला दोषी ठरवले. यानुसार, सर्व श्रीलंकेच्या खेळाडूंच्या मॅच फीमधून ५ टक्के रक्कम कापण्यात आली आहे. या प्रकरणात औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही, कारण श्रीलंकेचा कर्णधार चरित असलंका याने गुन्हा मान्य केला आणि सुनावलेली शिक्षाही स्वीकारली.
Sri Lanka hold their nerves in a thrilling finish to go 1-0 up in the ODI series against Zimbabwe 🙌#ZIMvSL 📝: https://t.co/g9G0zQleHm pic.twitter.com/eXcnmVXoLx
— ICC (@ICC) August 29, 2025
पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने ५० षटकांत ६ गडी गमावून २९८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेचा संघ ५० षटकांत ८ गडी गमावून २९१ धावाच करू शकला, ज्यामुळे श्रीलंकेने ७ धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या वनडेमध्ये झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना २७७/७ धावा केल्या. श्रीलंकेने हे आव्हान ५ गडी राखून सहज पूर्ण केले आणि मालिका २-० अशी जिंकली.
दोन सामन्यांची वनडे मालिका संपल्यानंतर आता झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ सप्टेंबर रोजी, दुसरा सामना ६ सप्टेंबर रोजी आणि तिसरा सामना ७ सप्टेंबर रोजी खेळला जाईल.