शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
ICC Test Rankings : आयसीसीने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली असून कसोटी क्रिकेट विश्वात मोठी उलथापालथ झाली आहे. या ताज्या क्रमवारीत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने उंच उडी घेतली आहे. गिल त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारीवर पोहोचला आहे. गिल त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सहाव्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. त्याच वेळी इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटला त्याच्याच संघ सहकारी असणाऱ्या हॅरी ब्रूकने मागे टाकले आहे. हॅरी ब्रूक आता फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
शुबमन गिलने इंग्लंडविरुद्ध सुरू असणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात गिलने अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले. त्याने एजबॅस्टन कसोटीच्या पहिल्या डावात २६९ आणि दुसऱ्या डावात १६१ धावांची खेळी केली. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात १५० पेक्षा जास्त धावा करणारा तो इतिहासातील दुसराच खेळाडू ठरला आहे.
गिलने फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत १५ स्थानांनी झेप घेतली आहे. त्याने सध्याच्या मालिकेची सुरुवात २३ व्या स्थानावरून केली आणि आता तो 6 व्या स्थानी जाऊन बसला आहे. या मालिकेत त्याची कामगिरी अशीच सुरू राहिली तर तो मालिकेच्या अखेरीस अव्वल स्थान गाठू शकतो.
Harry Brook reclaims the 🔝 spot in the latest ICC Test batter rankings after his spirited knock against India 👏
More ➡️ https://t.co/Df4PDR7PNf pic.twitter.com/ZxZnEazGXR
— ICC (@ICC) July 9, 2025
तर दुसरीकडे, इंग्लंडचा हॅरी ब्रूकने बर्मिंगहॅममधील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात १५८ धावांची खेळी केली, ज्यामुळे तो फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत एक स्थानवर जाऊन बसला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ब्रूक यापूर्वी एका आठवड्यासाठी नंबर-१ कसोटी फलंदाज बनला होता. इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जेमी स्मिथलाही या मालकीत क्रमवारीसाठी फायदा झाला आहे, त्याने नाबाद १८४ आणि ८८ धावा करून पहिल्यांदाच १६ स्थानांनी वर जाऊन टॉप-१० मध्ये प्रवेश दस्तक दिले.
एजबॅस्टन कसोटीत ८९ आणि ६९ धावांची खेळी करणारा रवींद्र जडेजा सहा स्थानांनी पुढे जाऊन ३९ व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्या देखील कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत सुधारणा झाली. सिराज आणि आकाश दीप अनुक्रमे २२ व्या आणि ४५ व्या स्थानावर पोहोचले आहे.
बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद ३६७ धावांची विक्रमी खेळी करणारा दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर फलंदाजी क्रमवारीत ३४ स्थानांनी झेप घेऊन कारकिर्दीतील सर्वोत्तम २२ व्या स्थानी पोहोचला आहे. तसेच त्याने तीन विकेट्सही घेतल्या, ज्यामुळे तो आता गोलंदाजांच्या यादीत त्याला चार स्थानांचा फायदा होऊन ४८ व्या स्थानावर पोहोचला आहे.
हेही वाचा : IND VS ENG : लॉर्ड्स कसोटीसाठी ब्रिटिश भारताविरुद्ध उतरवणार ‘हे’ घातक शस्त्र; इंग्लंडची प्लेइंग-११ जाहीर