वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
Vaibhav Suryavanshi’s record : वैभव सूर्यवंशी आपल्या आक्रमक फलंदाजीने नेहमीच चर्चेत असतो. अशातच तो पुन्हा एकदा चर्चेत अल आहे. वैभव सूर्यवंशीने १४ वर्षे आणि २९४ दिवसांच्या वयात अंडर-१९ विश्वचषक पदार्पण करून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. त्याने भारतीय वंशाच्या नितीश कुमारचा १८ वर्षे जुना विक्रम देखील मोडीत काढला आहे. ज्याने १५ वर्षे आणि २४५ दिवसांच्या वयात कॅनडासाठी पदार्पण करत हा कारनामा केला होता.
गुरुवारी क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात आलेल्या अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशील ४ चेंडूत फक्त २ धावाच करता आल्या. वैभव सूर्यवंशी त्याच्या फलंदाजीने चाहत्यांना खुश करण्यात अपयशी ठरला असला तरी भारताने डकवर्थ-लुईस पद्धतीने हा सामना ६ विकेट्सने आपल्या खिशात टाकला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अमेरिका संघाने ३५.२ षटकांत फक्त १०७ धावाच केल्या. संघाकडून नितीश सुदिनीने ५२ चेंडूत ४ चौकारांसह सर्वाधिक ३६ धावा केल्या. संघाकडून आदिनाथ झांबनेही १८ धावांचे योगदान दिले. तर भारताकडुन हेनिल पटेलने सर्वाधिक पाच बळी घेतले.
पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात भारतासमोर ३७ षटकांत ९६ धावांचे लक्ष्य देण्यात आले. भारताने हे लक्ष्य १७.२ षटकांत पूर्ण केले. भारताकडून अभिज्ञान कुंडूने ४१ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या, तर कर्णधार आयुष म्हात्रेने १९ धावांचे योगदान दिले. तर विहान मल्होत्राने १८ धावा केल्या, तसेच कनिष्क चौहान हा १० धावांवर नाबाद राहिला.
प्रतिस्पर्ध्याकडून ऋत्विक अप्पीदीने सर्वाधिक दोन बळी घेतले, तर ऋषभ सिम्पी आणि उत्कर्ष श्रीवास्तव यांनी प्रत्येकी एक बळी गहण्यात यश मिळवले. भारतीय संघ १७ जानेवारी रोजी त्यांच्या दुसऱ्या गट अ सामन्यात बांगलादेशविरुद्ध आपला दूसरा सामना खेळणार आहे. हा सामना बुलावायो येथील त्याच मैदानावर खेळला जाणार आहे. त्यानंतर भारतीय संघाचा २४ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध सामना असणार आहे.






