IND vs AUS 2nd ODI (Photo Credit- X)
IND vs AUS 2nd ODI 2025: तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना गमावल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना (Second ODI) निर्णायक असणार आहे. गुरुवार, २६ ऑक्टोबर रोजी अॅडलेड (Adelaide) येथे होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाच्या अष्टपैलू खेळाडूंच्या प्रचंड विश्वासाची कठोर परीक्षा होईल.
पुन्हा एकदा सर्व क्रिकेट चाहत्यांच्या नजरा विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यावर असतील. दमदार कामगिरी करून मालिका १-१ अशी बरोबरीत आणण्यासाठी हे दोन्ही अनुभवी फलंदाज उत्सुक असतील.
पहिल्या सामन्यात पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय फलंदाजी अडचणीत आली होती आणि संघाला सात विकेट्सनी पराभव पत्करावा लागला. मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांसारख्या गोलंदाजांना केवळ १३१ धावांचा बचाव करणे शक्य झाले नव्हते.
हार्दिक पंड्याला लॉटरी? ‘या’ मालिकेसाठी भारतीय संघात करणार ‘रॉयल’ पुनरागमन
अॅडलेड ओव्हलमधील आव्हाने वेगळी नसतील, कारण मिशेल स्टार्क (Mitchell Starc) आणि जोश हेझलवूड (Josh Hazlewood) पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांना कठीण आव्हान देण्यासाठी सज्ज आहेत. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक लढत अपेक्षित आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना २३ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कुठे खेळला जाईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अॅडलेड ओव्हल येथे खेळला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजता सुरू होईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर कुठे प्रसारित केले जाईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर कुठे प्रसारित केले जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण टीव्हीवर कुठे प्रसारित केले जाईल?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार अॅप आणि त्यांच्या वेबसाइटवर प्रसारित केले जाईल.
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग
ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मॅट रेनशॉ, कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, नॅथन एलिस, जोश हेझलवुड, मिचेल स्टार्क आणि अॅडम झांपा