रशियाचा इशारा? पुतिन यांच्या आदेशानुसार मॉस्कोचा अणुशक्तीचा सराव ; जगभरात पुन्हा तणाव (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia’s Nuclear Forces Practice : मॉस्को : रशियाने (Russia) पुन्हा एकदा जगासमोर आपली ताकद दाखवली आहे. रशियाने आपल्या अणुशक्तीचे प्रदर्शन केले आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी याचे आदेश दिले होते. त्यांच्या आदेशानुसार, रशियाने आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या (ICBM), तसेच क्रूझ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याचे एक फुटेजही प्रसिद्ध केले आहे. यामध्ये भू-दल, हवाई दल आणि नौदलाच्या सैनिकांनी सराव केला आहे. रशियाच्या क्रेमलिनने जारी केलेल्या माहितीनुसार, तिन्ही अणु दलांच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. तसेच पुतिन यांनी स्वत: या सरावाचे निरिक्षण केले आहे. तसेच त्यांनी रशियाच्या रणनीतीक अणु ताकदीच्या तयारीची पडताळणीही केली आहे.
क्रेमलिनने दिलेल्या माहितीनुसार, या सरावाचा हेतू रशियाच्या अणु शस्त्रांची प्रणाली तयार करणे, त्यांचे नियंत्रण आणि क्षमता तपासणे होता. रशियाचे लष्करप्रमुख जनरल वालेरी गेरासिमोव यांनी व्हिडिओ कॉलिंगवरुन पुतिन यांना या सरावाची माहिती. या सरावाचा आणखी एक मुख्य उद्देश म्हणजे अण्वस्त्र वापरासाठी अधिकृत प्रक्रियांची तपासणी करणे होता.
🇷🇺 Russia’s Tu-95MS Long-Range Bombers Join Strategic Forces Drill – Firing Air-Launched Cruise Missiles from High Altitude 📹: Russia’s MoD https://t.co/sO4ehfkNaw pic.twitter.com/PBGuHL6hx0 — RT_India (@RT_India_news) October 22, 2025
रशिया नेहमी आपल्या अणु क्षेपणास्त्रांची चाचणी घेत असतो. यातून जगाला रशिया दाखवनू देतो की आजही त्यांच्याकडे अण्वस्त्रांचे सर्वाच मोठे भंडार आहे. हा सरावा अत्यंत महत्त्वाचा मानला जाता. याच काळात नाटोनेदेखील आपल्या अणु शक्तीचे प्रदर्शन सुरु केले होते. ज्यामध्ये तब्बल १३ देशांचे ६० हून अधिक विमाने, लढाऊ विमाने आणि बॉम्बर सहभागी होते.
परंतु रशियाच्या या सरावाला तज्ज्ञांनी एक मोठी तयारी म्हटले आहे. काहीतरी मोठे घडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुतिन यांनी या सरावाला त्यांचा पुर्वनियोजित युद्धाभ्यास म्हटले आहे. परंतु हा सराव अशा वेळी होत आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) पुतिनसोबतची बुडापेस्टमधील बैठक रद्द केली आहे.
सध्या रशियाच्या या अणुशक्ती प्रदर्शनाने पुन्हा एकदा जगाचे लक्ष मॉस्कोकडे वेधले गेले आहे. यासरावातून पाश्चत्य देशांना रशियाने त्यांची अणुशक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.
Uganda Accident : युगांडा हादरला! साखळी अपघतातमुळे रस्त्यावर हाहा:कार ; ५० हून अधिक लोकांचा मृत्यू