कीव हादरलं! रशियाच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ल्याने अनेक भाग अंधारात ; सहा ठार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Russia Ukraine War : कीव : रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष (Russia Ukraine War) अधिक तीव्र होत चालला आहे. या युद्धाला तीन वर्षाहून अधिक काळ लोटत चालला असून पुन्हा एकदा रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. रशियाने युक्रेनवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मार केला आहे. या हल्ल्यामुळे युक्रेन पूर्णपणे अंधारात बुडाला आहे. रशियाने युक्रेनच्या उर्जा सुविधांवर हल्ला केला आहे. हा हल्ला अशा वेळी करण्यात आला आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांच्यासोबत अगामी बैठक रद्द केली आहे. यामुळेच रशिया नाराज असल्याचे आणि हल्ला केला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
रशियाच्या या हल्ल्यात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या उर्जा मंत्रींनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने रात्रभर त्यांच्या उर्जा सुविधांवर हल्ले केले आहे. मंगळवारी रात्री हे हल्ले सुरु झाले होते, जे बुधवारी पहाटेपर्यंत सुरुच राहिले. यामुळे युक्रेनची संपूर्ण उर्जा व्यवस्था कोलमडली आहे. या हल्ल्यामुळे देशभरात अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे.
रशियाच्या या हल्ल्यावर युक्रेनेचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymir Zelensky) यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे ती, रशियाला अजूनही युद्ध थांबवायचे नाही, त्यांच्यावर पुरेसा दबाव नसल्यामुळे ते हल्ले करत आहेत. झेलेन्स्की यांनी युरोपियन युनियन, अमेरिका आणि G-7 च्या देशांना रशियावर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे. झेलेन्स्कींनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या झापोरिझिया, कीव, ओडेसा, चेर्निहाइव, किरोव्होह्रद, पोल्तावा, विन्नित्सिया, चर्कासी आणि सुमी या प्रदेशांचे मोठे नुकसान झाले आहे.
याचवेळी युक्रेनने देखील प्रत्युत्तरदाखल रशियाच्या ब्रायंस्क प्रदेशातील रासायनिक कारखान्यावर हल्ला केला आहे. हा कारखाना रशियाच्या लष्करी आणि औद्यागिक क्षेत्राचा महत्त्वाचा भाग मानला जातो. या ठिकाणी रशिया आपले बारुद, क्षेपणास्त्र इंधन आणि गोळाबारुद साठा ठेवतो. दोन्ही देशांच्या सततच्या हल्ल्यामुळे संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. दरम्यान याच वेळी रशियाने आपल्या अणु शक्तीचा सरावही सुरु केला आहे. यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. रशियाने युक्रेनवर कधी केला हल्ला?
रशियाने मंगळवारी (२१ ऑक्टोबर) रात्री रशियावर तीव्र हल्ले केले, जे बुधवारी (२२ ऑक्टोबर) पहाटेपर्यंत सुरुच होते.
प्रश्न २. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधअये किती जीवितहानी झाली?
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमध्ये दोन लहान मुलांसह सहाजण ठार झाले आहे, तर १८ जखमी झाले आहे.
प्रश्न ३. रशियाने हल्ल्यामध्ये युक्रेनच्या कोणत्या भागांचा नुकसान झाले आहे?
रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या अनेक भागांचे नुकसान झाले आहे. यामध्ये झापोरिझिया, कीव, ओडेसा, चेर्निहाइव, किरोव्होह्रद, पोल्तावा, विन्नित्सिया, चर्कासी आणि सुमी या प्रदेशांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्रश्न ४. युक्रेनने प्रत्युत्तरदाखल रशियाच्या कोणत्या भागावर हल्ला केला?
युक्रेनने देखील प्रत्युत्तरदाखल रशियाच्या ब्रायंस्क प्रदेशातील रासायनिक कारखान्यावर हल्ला केला आहे. हा कारखाना रशियाच्या लष्करी आणि औद्यागिक क्षेत्राचा महत्त्वाचा भाग मानला जातो.
प्रश्न ५. रशियाच्या हल्ल्यावर युक्रेनच्या अध्यक्ष झेलेन्स्की यांनी काय प्रतिक्रिया दिली?
रशियाच्या हल्ल्यावर झेलेन्स्की यांनी तीव्र संताप व्यक्त करत रशियाला अजूनही युद्ध थांबवायचे नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी युरोपियन युनियन, अमेरिका आणि G-7 च्या देशांना रशियावर निर्बंध घालण्याची मागणी केली आहे.
रशियाचा इशारा? पुतिन यांच्या आदेशानुसार मॉस्कोचा अणुशक्तीचा सराव ; जगभरात पुन्हा तणाव