फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
भारताच्या संघाचा पहिला सामना हा श्रीलंकेविरुद्ध पार पडला. हा सामना भारतामध्ये खेळवण्यात आला आणि ती इंडियाच्या या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने फार काही चांगले सुरुवात केली नाही. श्रीलंके विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिले सहा विकेट्स गमावल्यानंतर दीप्ती शर्मा आणि अमानज्योत कौर या दोघींनी ही दमदार खेळी दाखव भारताच्या संघाला विजय मिळवून दिला होता. भारताचा संघाने दुसरा सामना हा सहज जिंकला हा सामना भारतीय संघाचा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेत खेळण्यात आला होता. भारताच्या संघाने श्रीलंके विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये श्रीलंकेला 59 धावांनी पराभूत केले होते तर दुसरा सामन्यात पाकिस्तानच्या संघाला भारताने 88 धावांनी मात दिली होती.
त्यानंतर भारतीय संघाला सलग तीन सामन्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय संघाचा तिसरा सामना हा दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळवण्यात आला होता हा सामना भारताचा संघाला महागात पडला आणि टीम इंडियाला पराभवात सामना करावा लागला होता. भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध भारत निराशाजनक कामगिरी भारताच्या संघाला दक्षिण आफ्रिके विरुद्ध तीन विकेट्स पराभवाचा सामना करावा लागला होता. टीम इंडियाचा महिला विश्वचषकाच्या लीग सामन्यांमध्ये चौथा सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाला होता.
या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 330 धावांचे लक्ष उभे केले होते तरीही ऑस्ट्रेलियन संघाने ते लक्ष 49 ओव्हर मध्ये गाठून भारताच्या संघाला तीन विकेट्स ने पराभूत केले होते. त्याचबरोबर इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले होते भारताच्या संघाने सुरुवातीपासून सामन्यावर स्वतःची पकड ठेवली होती पण शेवटच्या काही ओव्हरमध्ये चार धावा कमी पडल्या आणि भारताच्या संघाला या स्पर्धेतील तिसरा पराभव स्वीकारावा लागला होता. न्युझीलँड विरुद्ध भारतीय संघाचा पुढील सामना झाला होता हा सामना डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला होता.
या सामनामध्ये भारताच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध 340 धावा केल्या होत्या आणि या सामन्यात डीएलएस मेथड नुसार भारताच्या संघाने न्यूझीलंडच्या संघाला 53 धावाने पराभूत केले होते. न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला होता बांगलादेश विरुद्ध होणारा सामना हा रद्द करण्यात आला होता पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही. भारतीय संघाची लढत ही उपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियन संघ विरुद्ध झाली. एलिस हेली, ऍशेस गार्डनर, बेट मुनी, एलिस पेरी, एलाना किंग यांसारख्या दिग्गज खेळाडूंना पराभूत करून भारताच्या संघाने अंतिम फेरीमध्ये फायनलचे तिकीट मिळवले आहे.
ऑस्ट्रेलियन संघाने सेमी फायनल च्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता पहिले फलंदाजी करत ऑस्ट्रेलियन संघाने 338 धावा करून मोठे लक्ष भारतीय संघासमोर उभे केले होते. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने 338 धावांचा पाठलाग करत ऑस्ट्रेलियन संघाने दिलेले हे लक्ष 48.3 ओवर मध्ये पूर्ण करून पाच विकेट्सने सेमी फायनल मध्ये विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा फायनल चा सामना हा दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघ विरुद्ध होणार आहे दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने देखील सेमी फायनल च्या सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सेमी फायनल च्या सामन्यांमध्ये इंग्लंडच्या संघाला पराभूत करून फायनल मध्ये प्रवेश केला आहे.
इंग्लंडच्या संघाला दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 125 धावांनी पराभूत करून पाण्याचे तिकीट पक्के केले होते. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट तिच्या जोरावर 143 चेंडूंमध्ये 169 धावा करून धुवाधार फलंदाजी केली होती. त्यामुळे भारतीय संघासमोर तिचे मोठे आव्हान असणार आहे त्याचबरोबर मर्जीना कॅम्प हिने मागील सामन्यांमध्ये इंग्लंड विरुद्ध पाच विकेट्स घेतले होते त्यामुळे भारतीय संघाचे लक्ष या दोन महत्त्वाच्या खेळाडूंवर नक्कीच असणार आहे.






