सौजन्य - BCCI ICC Rankings : जसप्रीत बुमराह ठरला जगातील सर्वोत्तम गोलंदाज; 'या' दिग्गजांना मागे टाकत जागतिक क्रमवारीत गाठला 1 नंबर
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी जसप्रीत बुमराहने आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर आपल्या नावावर अप्रतिम विक्रम केला आहे. कसोटी गोलंदाज म्हणून, तो रँकिंगमध्ये सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा गोलंदाज ठरला. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत 21 बळी घेतले आहेत.
मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना
एकीकडे भारतीय संघ बॉक्सिंग डे कसोटीच्या तयारीत व्यस्त असून मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे, तर दुसरीकडे जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे. भारताचा गोलंदाजी हुकमी एक्का जसप्रीत बुमराहने मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मालिकेतील तिस-या सामन्यात 9 विकेट्स घेत चमकदार कामगिरी केली. यासह तो कसोटी इतिहासात सर्वाधिक रेटिंग गुण मिळवणारा संयुक्तपणे पहिला भारतीय ठरला आहे.
बुमराहने गाबा कसोटीत आपल्या दमदार कामगिरीने रचला इतिहास
गाबा कसोटीत ९४ धावांत ९ बळी घेत त्याने आपल्या रेटिंग गुणांमध्ये १४ गुणांची भर घातली आणि आता त्याचे ९०४ रेटिंग गुण झाले आहेत. याआधी नुकतेच निवृत्त झालेल्या रविचंद्रन अश्विनने डिसेंबर २०१६ मध्ये मुंबईत झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीनंतर इतकेच गुण मिळवले होते. बुमराहने या मालिकेत आतापर्यंत 21 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामुळे त्याला गोलंदाजी क्रमवारीत 48 रेटिंग पॉईंट्सपर्यंत आघाडी मिळाली आहे. कागिसो रबाडा (८५६) आणि जोश हेझलवूड (८५२) दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
रविचंद्रन अश्विन अजूनही टॉप-५ मध्ये सामील
मोहम्मद सिराज या यादीत एका स्थानाने 24 व्या स्थानावर पोहोचला आणि ट्रॅव्हिस हेड गोलंदाजांच्या यादीत पहिल्या 100 मध्ये सामील झाले. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स ८२२ गुणांसह चौथ्या स्थानावर असून निवृत्त भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन ७८९ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. रवींद्र जडेजाने चौथे स्थान गमावले असून तो आता 10 व्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्क 11व्या, तर नॅथन लियॉन 7व्या क्रमांकावर आहे. मॅट हेन्री सहाव्या, श्रीलंकेचा प्रभात जयसूर्या आठव्या आणि पाकिस्तानचा नोवान अली 9व्या स्थानावर आहे.
सर्वाधिक कसोटी रेटिंग गुण मिळवणारे ५ गोलंदाज
इंग्लंडच्या सिडनी बर्न्सच्या नावावर विश्वविक्रम असल्याचे येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे. 1914 मध्ये त्याने 932 गुण मिळवले होते, तर इंग्लंडचा जॉर्ज लोहमन 931 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. कसोटी इतिहासाच्या या विशेष यादीत पाकिस्तानचा विश्वविजेता कर्णधार इम्रान खान ९२२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन ९२० गुणांसह चौथ्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅकग्रा ९१४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.






