फोटो सौजन्य - सोशल मीडिया
चेतेश्वर पुजारा : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे तीन सामने झाले आहेत. या मालिकेत सध्या १-१ अशी बरोबरी आहे. तरीही भारताच्या संघाने तीनही सामन्यांमध्ये फलंदाजीमध्ये खराब सुरुवात केल्यामुळे भारताच्या संघाला त्याची भरपाई करावी लागली आहे. भारताचे फक्त दोन ते तीन फलंदाज ऑस्ट्रेलिया विरुद्ध फलंदाजी करण्यात यशस्वी ठरले आहेत. भारताच्या संघाच्या मागील झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेपासून फलंदाजी डगमगलेली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या फलंदाजीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता भारताचा दिग्गज कसोटी क्रिकेटचा खेळाडू चेतेश्वर पुजाराने भारताच्या युवा खेळाडूंना फलंदाजीच्या काही टिप्स दिल्या आहेत यावर एकदा नजर टाका.
चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची चांगलीच झोप उडवली आहे. भारताने २०१८ आणि २०२०-२१ मध्ये ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला तेव्हा पुजाराची भूमिका दोन्ही मालिकांमध्ये खूप महत्त्वाची होती. पुजारा सध्या कसोटी संघाबाहेर आहे आणि तो सध्या सुरु भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान स्टार स्पोर्ट्ससाठी हिंदी कॉमेंट्री करत आहे.
सत्य काही वेगळचं, मोहम्मद शामी आणि सानिया मिर्झाचा फोटो झाला व्हायरल
पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डेला खेळवला जाणार आहे. मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत असून मेलबर्नमध्ये जोही संघ जिंकेल तो मालिकेत अजेय आघाडी घेईल, त्यामुळे हा मालिकेतील अत्यंत महत्त्वाचा सामना असणार आहे. या सामन्यापूर्वी पुजाराने टीम इंडियाचे युवा फलंदाज शुभमन गिल आणि यशश्वी जैस्वाल यांना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पुजारा म्हणाला, ‘मालिकेने घेतलेले वळण पाहता, मेलबर्नमधील खेळपट्टी थोडी अवघड असू शकते. अशा परिस्थितीत खेळपट्टीवर थोडे अधिक गवत दिसू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत खेळाडूंना नवा चेंडू बघूनच खेळावे लागेल, तसे केएल राहुल या मालिकेत करत आहे. ऑस्ट्रेलियात केएल ज्या प्रकारे फलंदाजी करत आहे त्यावरून गिल आणि जैस्वाल खूप काही शिकू शकतात.
पुजारा पुढे म्हणाला, ‘बॉल शरीराच्या जवळ जवळ खेळा, शक्य तितके चेंडू सोडा आणि जर तुम्ही बॉल चालवण्याचा विचार करत असाल तर योग्य चेंडू निवडणे खूप महत्वाचे आहे. त्याच वेळी, चेंडूच्या वेळेवर अधिक लक्ष केंद्रित करा आणि ते वेगाने मारण्यावर नाही. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात खाते न उघडता बाद झालेल्या जैस्वालने दुसऱ्या डावात १६१ धावा केल्या, मात्र त्यानंतर चार डावात त्याने केवळ ०, २४, ४, नाबाद ४ धावा केल्या. गिलबद्दल बोलायचे झाले तर तो पर्थ कसोटी खेळला नाही, तर ॲडलेडमध्ये त्याने ३१ आणि २८ धावा केल्या तर ब्रिस्बेनमध्ये तो फक्त एक धावा काढून बाद झाला.