फोटो सौजन्य - Chennai Super Kings सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये काल पाच सामान्यांची T२० मालिका संपली. यामध्ये भारताच्या संघाने या मालिकेमध्ये ४-१ असा विजय मिळवला आहे. टीम इंडियाने २०२४ मध्ये झालेल्या T२० विश्वचषकाचे जेतेपद देखील नावावर केले आणि T२० क्रिकेटमध्ये तेव्हापासून एकही मालिका गमावलेली नाही. T२० विश्वचषक झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आणि विराट कोहली या दोघांनी T२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर टीम इंडियाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे. सध्या सूर्यकुमार यादवचा फॉर्म चांगला आणि पण त्याने त्याचे कॅप्टन्सी कौशल्य दाखवले आहेत.
भारतीय क्रिकेट संघातील एक परंपरा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सुरू केली होती. भारतीय संघ जेव्हा जेव्हा एखादी मालिका जिंकतो तेव्हा कर्णधार रोहित शर्मा मालिकेत पदार्पण केलेल्या किंवा संघात नवीन असलेल्या संघातील युवा खेळाडूंना मालिका जिंकल्यानंतर मिळालेली ट्रॉफी द्यायचा, अशी परंपरा होती. ही परंपरा विराट कोहलीने कर्णधार म्हणून अनेक वर्षे पाळली आणि रोहित शर्मानेही तेच केले आणि तो अजूनही वनडे आणि कसोटी मालिकेत करत आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवही त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आहे .
𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎!
Congratulations #TeamIndia on winning the #INDvENG T20I series 4️⃣-1️⃣ 👏👏 🏆@IDFCFIRSTBank pic.twitter.com/ucvFjSAVoK
— BCCI (@BCCI) February 2, 2025
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ ने जिंकल्यानंतर मुंबईत विजयी जल्लोष झाला, तेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादव बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारल्यानंतर संघाच्या फोटोसाठी पोहोचला. कर्णधार सूर्याने मध्यभागी उभ्या असलेल्या ध्रुव जुरेल आणि हर्षित राणा यांना ट्रॉफी दिली आणि स्वतः बाजूला गेला. यानंतर फोटो क्लिक झाला, ध्रुव जुरेल आणि हर्षित राणा हे या संघात नवीन होते. ध्रुव जुरेल अद्याप खेळला आहे, परंतु हर्षितने या मालिकेतून आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले.
Ranji Trophy 2025 : विराट कोहली फ्लॉप पण दिल्लीच्या झोळीत विजय, रेल्वेला केलं पराभूत
हर्षित राणाने पुण्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या सामन्यात कंकशन पर्याय म्हणून पदार्पण केले. हर्षित राणा दुसऱ्या डावात शिवम दुबेच्या बदल्यात गोलंदाजी करायला आला आणि त्याने तीन विकेट घेत सामन्याचे चित्र फिरवले. मात्र, मुंबईत झालेल्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही, कारण शिवम दुबे पूर्णपणे तंदुरुस्त होता, तर मोहम्मद शमीने वेगवान गोलंदाजीत पुनरागमन केले होते. अशा स्थितीत हर्षित राणाला अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकले नाही. एकदिवसीय मालिकेत जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणा खेळताना दिसणार आहे.
भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध तीन सामान्यांची घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा करणार आहे. चॅम्पियन ट्रॉफी २०२५ च्या आधी ही भारतीय संघाची एकमेव एकदिवसीय मालिका असणार आहे.