फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यासाठी क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. दोन्ही संघासाठी चौथा सामना महत्वाचा आहे त्यामुळे दोन्ही संघ कोणत्याही परिस्थतीमध्ये जिंकण्याच्या इराद्यात मैदानात उतरणार आहेत. २६ डिसेंबर रोजी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेचा चौथा सामना रंगणार आहे. सध्या मालिकेमध्ये तीन सामन्यानंतर १-१ अशी बरोबरी आहे. तिसऱ्या सामन्यानंतर भारताचा दिग्गज खेळाडू रविचंद्रन अश्विनने निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर आता संघामध्ये अश्विनच्या जागेवर तनुष कोटियनला स्थान मिळाले आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मंगळवारी २४ डिसेंबर रोजी बॉक्सिंग डे कसोटी सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत आला. रोहितने त्याला झालेल्या दुखापतीच्या संदर्भात, सराव खेळपट्टीचा वाद आणि फलंदाजीची स्थिती यासंबंधीच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तो मधल्या फळीतच खेळणार असल्याचे रोहित शर्माने स्पष्ट सांगितले आहे. याशिवाय रविवारी सराव करताना झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीबाबत तो पूर्णपणे बरा असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच वेळी, सराव करताना वापरल्या जाणाऱ्या खेळपट्ट्यांबाबत तो म्हणाले की त्यांना असमान उसळी होती.
“मागील कसोटीपासून काहीही बदलले नाही, ज्याबद्दल मी बोललो. आमच्याकडे सरावाची दोन सत्रे झाली आहेत. त्या दोन सत्रांमध्ये काहीही बदलू शकत नाही. खेळपट्टीचा सर्वांच्या संदर्भात,” रोहितने पत्रकार परिषदेत खेळपट्टीवरील वादावर सांगितले खेळपट्टीवर बाऊन्स आहे, त्या खेळपट्ट्या होत्या ज्यांचा आम्ही गेल्या काही दिवसांत सराव केला होता आणि आता ती फक्त एकच आहे. तो दिवस आहे जिथे आम्ही त्याची दुसरी बाजू पाहू, जी ताजी विकेट असेल, म्हणून आम्ही जाऊन ते कसे आहे ते पाहू आणि त्यानुसार आम्ही सराव करू.”
त्याच्या दुखापतीबाबत रोहित म्हणाला, तो पूर्णपणे बरा असून त्याला कोणतीही समस्या नाही. यानंतर त्याला विचारण्यात आले की त्याची फलंदाजीची स्थिती बदलणार आहे का आणि त्याने उत्तर दिले, “त्याची काळजी करू नका, मला वाटते की कोण कुठे फलंदाजी करेल, ही अशी गोष्ट आहे जी आपण स्वतःमध्ये (संघात) शोधली पाहिजे.” प्रत्येक पत्रकार परिषदेत मी कुठे फलंदाजी करेन, काहीही असो, आमचा संघ चांगला दिसण्यासाठी किंवा आम्हाला यशस्वी होण्याची सर्वोत्तम संधी देण्यासाठी मी चर्चा केली पाहिजे असे नाही, आम्ही तसे प्रयत्न करू.” यावरून रोहित पुन्हा सहाव्या क्रमांकावर येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दोन सामन्यांत त्यांनी ही कामगिरी केली आहे, मात्र त्यांना यश आले नाही.
कॅप्टन रोहित शर्माला रिषभ पंतने मागील तीन सामन्यांमध्ये फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही त्यामुळे त्याच्या कामगिरीवर त्याला प्रश्न केला तेव्हा रोहित म्हणाला की, आपण त्याला तीन सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली नाही त्यामुळे जज करू शकत नाही. भारतामध्ये त्याने चांगली कामगिरी आणि धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा त्याचा रेकॉर्ड चांगला आहे त्यामुळे तुम्ही त्याला तीन सामान्यांवर जज करू शकत नाही. त्याला स्वतः कडूनच अपेक्षा आहेत त्यामुळे तो त्यावर सुधारणा करत आहे.