शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : CAB अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिका कसोटीपूर्वी चाहत्यांना दिले दिवाळीचे खास गिफ्ट!
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार शुभमन गिलची बॅट पूर्ण शांत दिसून आली. तसेच त्याच्या कर्णधारपदाचाही फारसा प्रभाव दिसून आला नाही. पर्थमधील हा पराभव त्याच्यासाठी अत्यंत निराशाजनक राहिला. कारण शुभमन गिल एकदिवसीय स्वरूपात कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत होता. शुभमन गिलला यापूर्वी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधील त्याच्या पहिल्या सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे तो विराट कोहलीनंतर तिन्ही फॉरमॅटमध्ये पहिलाच सामना गमावणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर रोहित शर्मा फक्त ८ धावांवर माघारी गेला, तर शुभमन गिल १० धावांवर नॅथन एलिसने बाद केले. विराट कोहलीला भोपळाही फोडता आलेला नाही. तसेच श्रेयस अय्यरही २४ चेंडूत ११ धावा काढून बाद झाला. तथापि, केएल राहुल (३८ धावा) आणि अक्षर पटेल (३१ धावा) यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. शेवटी, नितीश कुमार रेड्डी यांनी ११ चेंडूत १९ धावा करत धावसंख्या १३६ पर्यंत पोहचवण्यात मदत केली.
पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रति डाव २६ षटकांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. लहान लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियाने भारताच्या गोलंदाजांना काही एक संधी दिली नाही आणि २१.१ षटकांत लक्ष्य पूर्ण केले. मिशेल मार्शने नाबाद ४६ आणि जोश फिलिपने ३७ धावांचे महत्वाचे योगदान देत संघाला विजय मिळवून दिले. भारतीय गोलंदाजांना विकेट घेण्यात यश मिळाले नाही आणि परिणामी सामना एकतर्फी ठरला आणि भारताला सामना गमावा लागला.






