फोटो सौजन्य - सोशल मीडिया
राजीव शुक्ला : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे, या सामन्याचा आज पाचवा दिवस आहे. सध्या भारतामध्ये पावसाचे दिवस सुरु आहेत त्यामुळे पाऊस पडणे साहजिकच आहे. भारत बांग्लादेश यांच्यामधील दुसरा सामना २७ सप्टेंबर रोजी सुरु झाला. त्या दिनी सकाळी पाऊस झाल्यामुळे नाणेफेक आणि सामना सुरु व्हायला उशीर झाला होता. पहिल्या दिनी फक्त ३५ ओव्हरचा खेळ झाला. त्यानंतर मुसळधार पाऊस झाल्यामुळे खेळ मध्यस्थी रद्द करण्यात आला होता. दुसऱ्या दिनी मुसळधार पाऊस झाल्यामुळे खेळ बराच वेळ थांबला परंतु पाऊस थांबला नाही त्यामुळे दुसऱ्या दिनाचा खेळही रद्द करण्यात आला होता. तिसऱ्या दिनी मुसळधार पाऊस नसून मैदानाची स्थिती खराब असल्यामुळे सामना रद्द करावा लागला.
यावर आता बऱ्याच टीकेनंतर आता बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचे वक्तव्य समोर आले आहे. त्यांनी ग्रीन पार्क स्टेडियमच्या ड्रेनेज सुविधांचा बचाव केला आणि असे म्हटले की जर सतत पाऊस पडत असेल तर आपण फार काही करू शकत नाही. राजीव शुक्ला यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हंटले आहे की, ‘बीसीसीआय प्रशासक असल्याने आम्हाला अशा प्रकारच्या टीकेची जाणीव आहे. हे मैदान सुमारे ८० वर्षे जुने आहे, हे मैदान आपला वारसा आहे. ८० वर्षात पहिल्यांदाच इतका पाऊस झाला आहे की दोन दिवस आम्ही सामना आयोजित करू शकलो नाही. पण इतिहासात असे दिसून येते की येथे अद्याप एकही सामना रद्द झालेला नाही. जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पावसामुळे सामने रद्द झाले आहेत.
ते पुढे म्हणाले, ‘मला वाटत नाही की यावर जास्त गदारोळ व्हावा कारण जेव्हा हे मैदान आणि स्टेडियम बांधले जात होते तेव्हा ते तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. तंत्रज्ञान आता उपलब्ध झाले आहे. आमच्याकडे लखनौ स्टेडियममध्ये आधुनिक तंत्रज्ञान आहे. आम्ही वाराणसीमध्ये एक स्टेडियम बांधत आहोत, ज्यामध्ये पाणी काढण्यासाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आहे. आम्ही या प्रकारचे तंत्रज्ञान कानपूरमध्येही आणू.