फोटो सौजन्य – X (ICC)
भारताचा फलंदाज करून नायर आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघे फलंदाजी करत होते. टीम इंडियाने सर्व विकेट्स हे पहिल्याच सेशनमध्ये दुसऱ्या दिनी गमावले. करून नायर याने भारतीय संघासाठी 57 धावांची खेळी खेळली. तर वॉशिंग्टन सुंदर याने 26 धावा केल्या. गस अॅटकिन्सन याने संघासाठी चांगली कामगिरी केली आणि मालिकेचे पहिले सामन्यात त्याने पाच विकेट्स घेतले. गस अॅटकिन्सन याने भारताच्या मजबूत फलंदाजाना बाहेरचा रस्ता दाखवला त्याने यशस्वी जयस्वाल शुभमन गिल, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराज यांसारख्या खेळाडूंना बाहेरचा दाखवला.
Stumps on Day 2 at the Oval 🏟️ Yashasvi Jaiswal’s unbeaten half-century takes #TeamIndia to 75/2 in the 2nd innings and a lead of 52 runs 👌👌 Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#ENGvIND pic.twitter.com/uj8q4k9Q3H — BCCI (@BCCI) August 1, 2025
दुसरा दिवस हा गोलंदाजाच्या नावावर राहिला. इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या दिनी भारताच्या सर्व फलंदाजांना बाद करून 224 धावांवर रोखले. भारताच्या गोलंदाजांनी दुसऱ्या दिनी दुसरा इनिंग मध्ये कमाल ची कामगिरी केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना 247 धावांवर रोखले. दुसऱ्याच दिवशी तिसऱ्या इनिंगला सुरुवात झाली आहे.
भारतीय गोलंदाजांचे कामगिरीबद्दल सांगायचं झाले तर प्रसिद्ध कृष्णा याने संघासाठी चार विकेट्स घेतले त्याचबरोबर मोहम्मद सिराज याने देखील टीम इंडियाला चार विकेट्स मिळवून दिले. प्रसिद्ध कृष्णा याने जेम्स स्मिथ, जेमी ओवर्टन, जॅक क्रोली, गस यांना बाहेरचा रस्ता दाखवला. उर्वरित काम मोहम्मद सीराजाने केले, त्याने ओली पॉप, जो रूट, हरी ब्रूक, जेकब बेथल यांना पॅव्हेलियन चा रस्ता दखवला.
तिसऱ्या इनिंगला सुरुवात झाले आहे आणि भारताच्या संघासाठी सध्या यशस्वी जयस्वाल आणि आकाशदीप हे दोघे फलंदाज फलंदाजी करत आहेत. मध्ये भारताच्या संघाने दोन विकेट्स गमावून 75 धावा केल्या आहेत आणि भारताच्या संघाकडे सध्या 52 धावांची आघाडी आहे.






