फोटो सौजन्य – X (BCCI)
India vs England Toss Update : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाचव्या सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना भारताच्या संघासाठी फारच महत्वाचा असणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करणार आहे, तर इंग्लडच्या संघाचे कर्णधारपद हे या सामन्यासाठी ऑली पाॅपकडे असणार आहे. या मालिकेच्या स्थितीवर नजर टाकली तर सध्या इंग्लडच्या संघाकडे 2-1 अशी आघाडी आहे. त्यामुळे भारताच्या संघाला या सामन्यात जिंकणे गरजेचे आहे. या सामन्यामध्ये इंग्लडच्या संघाने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लडच्या संघामध्ये अनेक बदल झाले आहेत, यामध्ये संघाचा मुळ कर्णधार बेन स्टोक्स हा पाचवा सामना खेळणार नाही. त्याचबरोबर संघाचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर देखील या सामन्यात खेळणार नाही त्याच्या जागेवर या सामन्यात गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, यांना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आहे. इंग्लडचा युवा खेळाडू जेकब बेथेल याला देखील संघामध्ये स्थान मिळाले आहे. आता या संघासह इंग्लडचा संघ मालिकेमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
IND vs ENG 5th Test : पहिल्याच दिवशी पाऊस खलनायक? ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिनी नाणेफेकही अडचणीत!
भारताच्या संघामध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. या सामन्यात ऋषभ पंत हा दुखापतीमुळे मालिकेच्या बाहेर झाला आहे. त्याच्या जागेवर आज ध्रुव जुरेल हा संघासाठी खेळणार आहे. त्याचबरोबर भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील या सामन्यामध्ये खेळणार नाही. मागिल सामन्यामध्ये साई सुदर्शन याला संधी मिळाली होती पण त्याने पहिल्याच इंनिगमध्ये चांगली कामगिरी केली होती तर या मालिकेमध्ये आतापर्यत २ वेळा शुन्यावर बाद झाला आहे. शार्दुल ठाकुरच्या जागेवर या सामन्यामध्ये करुण नायर याला संघामध्ये स्थान मिळाले आहे.
मॅचेस्टर कसोटी सामन्यामध्ये भारताच्या फलंदाजांनी कमालीची कामगिरी केली आहे. त्यामुळे आता भारताचा संघ या शेवटच्या सामन्यामध्ये कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शुभमन गिल याने ४ शतक ठोकले आहेत, त्याचबरोबर रविंद्र जडेजाने देखील भारतीय संघासाठी शतक झळकावले आणि सामना ड्राॅपर्यत नेला. वाॅशिंग्टन सुंदर याने देखील त्याचे परदेशामध्ये शतक झळकावले.
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविंद्र जडेजा, वाॅशिंग्टन सुंदर, करुण नायर, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, आकाशदीप
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.