फोटो सौजन्य – X (Shubman Gill/ICC)
हॅरी ब्रुकला का मिळाला सामनावीराचा पुरस्कार : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये मालिका पार पडली या मालिकेमध्ये भारताच्या संघाने 2 सामने जिंकले तर 2 सामने इंग्लडच्या संघाने जिंकले. या मालिकेचा चौथा सामना हा ड्राॅ झाला त्यामुळे मालिका देखील ड्राॅ झाली. काल भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली इंग्लडच्या संघाला मालिकेमध्ये जिंकण्याची संधी होती पण भारताच्या संघाने त्याच्या हातामधुन विजय हिसकावला. निर्णायक सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाने ६ धावांच्या कमी फरकाने विजय मिळवत सर्वांना आश्चर्यचकित केले.
चौथ्या दिवसाच्या खेळाअखेर इंग्लंडने ६ विकेटच्या मोबदल्यात ३३९ धावा केल्या होत्या आणि विजयासाठी त्यांना ३५ धावांची आवश्यकता होती. मोहम्मद सिराजने इतकी घातक गोलंदाजी केली की संपूर्ण संघ ३६७ धावांवर गारद झाला. हॅरी ब्रूकला मालिकेसाठी शुभमन गिलसह सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
IND vs ENG : विजयानंतर मोहम्मद सिराजला आली या खेळाडूची आठवण, जिंकले चाहत्यांचे मन! पहा Video
अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी दरम्यान, भारतीय संघाच्या नवीन कसोटी कर्णधाराने भरपूर धावा केल्या. त्याने ५ सामन्यांमध्ये २ शतके आणि एका द्विशतकाच्या मदतीने एकूण ७५४ धावा केल्या. यामध्ये बर्मिंगहॅममध्ये खेळलेल्या २६९ धावांचा समावेश होता. या शानदार कामगिरीमुळे त्याला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. त्याच्यासोबत इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकलाही हा पुरस्कार देण्यात आला.
खरंतर, इंग्लंडमधील कसोटी मालिकेदरम्यान, अशी परंपरा आहे की कोणीही जिंकले तरी, मालिकावीराचा पुरस्कार दोन्ही संघांच्या खेळाडूंना दिला जातो. या कारणास्तव, भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा हॅरी ब्रूक यांची यासाठी निवड करण्यात आली. तथापि, त्यांची नावे आश्चर्यकारक होती कारण जो रूटने ब्रूकपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्याने 5 सामन्यांमध्ये 537 धावा केल्या होत्या तर ब्रूकच्या खात्यात फक्त 481 धावा होत्या.
Joe Root racked up 537 runs. Ben Stokes delivered with 304 runs and 17 wickets.
Still, Gautam Gambhir picked Harry Brook as England’s Player of the Series. 👀
Thoughts on the call? 🤔 #ENGvIND #GautamGambhir #HarryBrook #Sportskeeda pic.twitter.com/5xUBzcaXrT
— Sportskeeda (@Sportskeeda) August 5, 2025
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यान, मालिकावीराचा पुरस्कार कोणाला द्यायचा हे कोण ठरवते असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांची जबाबदारी आहे की त्यांच्या विरोधी संघातील कोणत्या खेळाडूला मालिकावीराचा पुरस्कार द्यायचा हे निवडावे. हॅरी ब्रूकला मालिकावीराचा पुरस्कार द्यायचा हा निर्णय भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा होता.