सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
Suryakumar Yadav chooses MS Dhoni as his tennis partner : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आता चर्चेत आला आहे. अलीकडेच तो त्याची पत्नी देविशा शेट्टीसोबत विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा आनंद लुटत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी त्याने एक मोठा खुलासा केला आहे की त्याला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला टेनिससाठी त्याचा दुहेरी पार्टनर म्हणून पाहायचे आहे.
सूर्यकुमारची विम्बल्डन स्पर्धा पाहण्याची पहिलीच वेळ होती. त्याच्या उपस्थितीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. विम्बल्डननेही त्याचा फोटो शेअर केला आणि म्हटले की “सूर्यकुमार यादवने SW19 मध्ये चमक आणली! तुम्हाला इथे पाहून खूप आनंद झाला’ टेनिसमधील त्याच्या आवडीबद्दल सांगताना सूर्यकुमार म्हणाला की, ‘मी टीव्हीवर टेनिस खूप पाहत असतो . मी नेहमीच सेंटर कोर्टच्या वातावरणाबद्दल ऐकत आलो आहे. विशेषतः जेव्हा खेळाडू तिथे प्रवेश करतात. आता मला ते समोरून जाणवत आहे, हा एक अतिशय खास असा अनुभव आहे.”
सूर्यकुमार यादवला जेव्हा विचारण्यात आले की जर त्याला टेनिस दुहेरी पार्टनर म्हणून क्रिकेटपटू निवडायचा असल्यास तर तो कोणाची निवड करेल? यावर तो सूर्याने उत्तर दिले कि, “नक्कीच एमएस धोनी. तो वेगवान आहे, त्याच्यात खूप ताकद आहे आणि तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे आणि अलिकडे जेव्हा तो क्रिकेट खेळत नसतो तेव्हा मी त्याला अनेक वेळा टेनिस खेळताना पाहिले आहे. त्यामुळे तो माझी पहिली पसंती असणार आहे.”
विम्बल्डन दौऱ्याबद्दल सूर्यकुमार म्हणाला की, “मी पहिल्यांदाच इथे आलो आहे आणि सर्वकाही परिपूर्ण असावे असे मला वाटत होते. खरे सांगायचे तर, माझी पत्नी देविशाने मला खूप मदत केली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून ती माझ्याबरोबर आहे. या अद्भुत अशा स्पर्धेत काय घालायचे हे ठरवण्यास मला मदत करत आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोक येथे आलेले आहेत, मी देखील त्यापैकी एक असून = फक्त या वातावरणाचा भाग होऊ इच्छित आहे.”
सूर्याने त्याच्या आवडत्या टेनिस खेळाडूबद्दल सांगितले कि, “मी खास करून नोवाक जोकोविचला भेटण्यासाठी येथे आलो आहे. मी त्याला खूप दिवसांपासून फॉलो करत असून मी त्याचे ‘सर्व्ह टू विन’ हे पुस्तक देखील वाचले आहे, ज्यामुळे मला खूप प्रेरणा मिळाली आहे. माझे वय लक्षात घेतले तर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट थोडे उशिराच सुरू केले, परंतु मी त्यांच्या संघर्षाच्या कथेशी संबंधित असण्याची शक्यता अवघे. ते ज्या पद्धतीने पुढे जात राहतात ते आश्चर्यकारक असेच आहे.”
हेही वाचा : शुभमन गिल शेजारी सारा तेंडुलकर; सर जडेजाने घेतली ‘प्रिन्स’ची फिरकी, युवा कर्णधार लालेलाल; पहा Video
सूर्या असे देखील म्हणाला की आपण विम्बल्डनबद्दल बोललो तर पीट सॅम्प्रस आणि रॉजर फेडरर हे दोन त्याचे आवडते खेळाडू आहेत. पुढे तो म्हणाला की जेव्हा हे खेळाडू कोर्टवर येत असत तेव्हा प्रेक्षक नाचायचे. पण माझा नेहमीच आवडता नोवाक जोकोविच राहिला आहे. सध्या मला कार्लोस अल्काराज खूप आवडतो, कारण तो कोर्टवर वादळासारखा खेळतो. असे देखील सूर्या म्हणाला.