बेन स्टोक्स आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील ३ सामने खेळून झाले आहेत.इंग्लंड संघाने या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चौथा सामना आजपासून म्हणजेच २३ जुलैपासून मँचेस्टर येथे खेळवला जात आहे. या सामन्यापूर्वी इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत फलंदाजी करताना दिसणार आहे.
इंग्लिश संघाने आपल्या प्लेइंग ११ ची घोषणा आधीच केली आहे. तर भारताने सामन्याच्या दिवशी आपला प्लेइंग ११ संघ जाहीर केला आहे. या मालिकेत आतपर्यंत भारतीय संघाने काही बदल केले आहेत. करून नायरच्या जागी साई सुदर्शनला संघा स्थान देण्यात आले आहे. तर आकाश दीपच्या जागी अंशुल कंबोजला पदार्पण करण्याची संधी दिली आहे. तसेच पहिल्या प्रसिद्ध कृष्णाच्या जागी शार्दुल ठाकूरला पुन्हा संधी दिली आहे.
मँचेस्टर कसोटी सामना हा शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी खूप महत्वाचा असणार आहे. कारण भारताने हा सामना जिंकला तर मालिकेत बरोबरी साधता येईल अन्यथा पराभव झाल्यास इंग्लंड ही मालिका आपल्या खिशात टाकेल. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघ जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
हेही वाचा : Olympics 2028 मध्ये एकाच आशियाई क्रिकेट संघाला एंट्री! चाहत्यांसाठी भारत-पाकिस्तान सामन्याची पर्वणी धूसर…
भारताच्या संघाने लाॅर्ड्स कसोटी सामन्यात आपली पकड निर्माण करून देखील विजय मिळवता आला नाही. या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडने भारतासमोर १९३ धावांचे योगदान दिलले होते. परंतु गेल्या दोन कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. या सामन्यात रविंद्र जडेजा आपली झुंज दिली खरी परंतु ती अपुरी पडली. त्यामुळे भारताला २२धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. तोच फॉर्म संघाला या सामन्यात दाखवावा लागणार आहे.
भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने आपली प्लेइंग ११ ची घोषणा केली आहे. आजपासून म्हणजे २३ जुलैपासून सुरु होणाऱ्या मँचेस्टर येथील सामन्यात इंग्लंडकडून एकमेव बदल करण्यात आला आहे. इंग्लंडने शोएब बशीरच्या जागी ३५ वर्षीय लियाम डॉसनचा संघात समावेश केला आहे. लॉर्ड्समध्ये शोएब बशीरला दुखापत झाली होती, त्यानंतर तो कसोटी मालिकेतून बाहेर जावे लागले.
हेही वाचा : BAN VS PAK : पाकिस्तानचा संघ बांगलादेशसमोर पूर्णपणे फेल! 125 धावांवर गुंडाळल, घरच्या मैदानावर मालिका जिंकली
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स आणि जोफ्रा आर्चर.