बेन स्टोक्स आणि शुभमन गिल (फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG 5thTest : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चार सामने खेळून झाले इंग्लंडने २-१ अशी आघाडी मिळवली आहे. तर नुकतीच मँचेस्टर येथे खेळवण्यात आलेला कसोटी सामना ड्रॉ झाला आहे. या मालिकेतील पाचवा सामना ३१ जुलैपासून ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या दरम्यान भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या कर्णधारणांनी तक्रारीचा सूर आवळला आहे. चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यादरम्यान फक्त तीन दिवसांचा कालावधी देण्यात आल्याने भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांनी याबद्दल तक्रार केली आहे.
बेन स्टोक्स आणि शुभमन गिल या दोघांकडून बुधवारी कसोटी सामन्यांमधील अंतर वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. या दोघांनी म्हटले की पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील गोलंदाजांवर जास्त कामाचा ताण बघता, दोन सामन्यांमधील तीन दिवसांचा ब्रेक खूप कमी आहे. लीड्स येथील पहिल्या कसोटी सामन्यानंतर आणि लॉर्ड्स येथील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर एका आठवड्याचे अंतर होते, मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या सामन्यात फक्त तीन दिवसांचा अंतर होते.
हेही वाचा : हरियाणाच्या हरदीपचा जगात डंका! कुस्तीत इराणला केले चितपट; जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत जिंकले सुवर्ण..
कमी अंतरामुळे खेळाडूंना बरे होण्यासाठी तसेच अराम मिळण्यासाठी वेळ मिळत नाही. खांद्याच्या दुखापतीमुळे स्टोक्स पाचव्या कसोटीमध्ये खेळताना दिसणार नाही. त्याच वेळी, भारतीय संघाचे अनेक गोलंदाज दुखापतींशी सामना करत आहेत.
पाचव्या कसोटी सामन्यांपूर्वी इंग्लंडचा कर्णधार स्टोक्स म्हणाला की, “पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सामन्यांमधील अंतर अधिक असणे चांगले असू शकले असते. दोन सामन्यांमध्ये आठ ते नऊ दिवसांचे आणि इतर दोन सामन्यांमध्ये तीन दिवसांचे अंतर आहे. एकूणच, पाच दिवसांचे अंतर राखले असते तर सातत्य राखणया जमले असते. दोन्ही संघांसाठी हे खूप कठीण झाले आहे. गोलंदाजांना खूप षटके टाकावी लागत असतात. एकदा आठ किंवा नऊ दिवसांचा ब्रेक येतो आणि नंतर एकदमच तीन दिवसांचा ब्रेक येतो. प्रत्येक सामन्यामध्ये चार किंवा पाच दिवसांचे अंतर असू शकले असते. ते चांगले झाले असते.
भारतीय कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, सर्व सामने पाच दिवस चालले आहेत, त्यामुळे खेळाडूंसाठी पुन्हा तयार व्हायला कठीण होऊन गेले. गिल म्हणाला “की मालिकेतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व सामने पाच दिवस चालले. फक्त पाच दिवसच नाही तर पाचव्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत ते सामने चालले. मला अशी कोणतीही मालिका आठवत नाही ज्यामध्ये सर्व चारही कसोटी सामने शेवटपर्यंत खेळले गेले असावेत. ते खूप कठीण होते.”
गिल पुढे म्हणाला की, जेव्हा दोन्ही संघ इतके कठीण क्रिकेट खेळत असतात तेव्हा तीन दिवसांचे अंतर खूप कमी होऊन जाते. आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की प्रत्येक सामन्यानंतर पाच किंवा सहा दिवसांचा ब्रेक घेतल्याने दौरा खूप लांबला गेला असता. दोन्ही मंडळांकडून हा निर्णय विचारात घेतला गेला असावा.