फोटो सौजन्य – X (BCCI)
भारत विरुद्ध इंग्लड T20 चौथा सामना : भारतीय महिला संघाचा सामना इंग्लंड विरुद्ध काल पार पडला. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या T20 मालिकेचा चौथा सामना काल खेळवण्यात आला होता. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने तिसऱ्या सामन्याच्या पराभवानंतर चौथ्या सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये दमदार विजय ठोकला आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या मालिकेमध्ये आता शेवटचा सामना भारतीय संघाला खेळायचा आहे त्यानंतर एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची t20 मालिका आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या सामन्याचे आयोजन ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियम येथे करण्यात आले होते. या सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या.
IND Vs ENG : राहुल द्रविडसह विराट कोहलीचा विक्रम धोक्यात! शुभमन गिलच्या १८ धावा अन् रचणार इतिहास..
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने पहिले नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. इंग्लंडच्या संघाने पहिले फलंदाजी करत फक्त 126 धावा केल्या. यामध्ये भारतीय संघाने कमालीची कामगिरी करत क्रिकेटस घेतले आणि चांगल्या इकॉनोमीने गोलंदाजी केली. भारतीय संघासाठी चरणी आणि राधा यादव या दोघींनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतले तर अमनज्योत कौर आणि दीप्ती शर्मा त्या दोघींनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
Win the match ✅
Win the series ✅ Jemimah Rodrigues and Richa Ghosh take #TeamIndia over the line 💪 Scoreboard ▶️ https://t.co/QF3qAMduOx#ENGvIND | @JemiRodrigues | @13richaghosh pic.twitter.com/f2KHmllSdj — BCCI Women (@BCCIWomen) July 9, 2025
भारतीय फलंदाजाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. भारतीय फलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा या दोघींनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. स्मृती मानधना नाही हिने संघासाठी या मालिकेमध्ये शतक झळकावले होते या सामन्यात तीने 32 धावांची खेळी खेळली. चांगली कामगिरी करू संघासाठी 33 धावा केल्या.
या मालिकेमध्ये जेमिमा रॉड्रिक्स हिने चांगले कामगिरी केले आहे या सामन्या तीने 24 धावांची खेळी खेळली आणि त्या संघासाठी महत्त्वाच्या धावा होत्या. भारतीय कर्णधार हरमन प्रीत कौर हिने संघासाठी 26 धावा केल्या. भारताच्या संघासाठी ही मालिका फारच महत्वाची होती भारताच्या संघाने या मालिकेमध्ये वर्चस्व गाजवले आणि इंग्लडच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर पराभुत केले. भारतीय महिला संघाची एकदिवसीय मालिका ही 16 जुलैपासुन सुरु होणार आहे.






