गौतम गंभीर आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील चार सामने खेळले गेले आहेत. यामध्ये इंग्लंडने २-१ अशी आघाडी घेतली असून एक सामना ड्रॉ झाला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना आज म्हणजे ३१ जुलैपासून केनिंग्टन ओव्हल येथे खेळला जात आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करत आहे. टीम इंडिया शेवटचा सामना जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत राखणायसाठी प्रयत्नशील असणार आहे. यादरम्यान भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संघाचा कर्णधार शुभमन गिलसाठी एक बाब अडचणीची ठरू शकते.
इंग्लंडबद्दल सांगायचं झालं तर, इंग्लंड ३-१ अशी मालिका जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे, ओव्हल येथे भारतासाठी एक मोठी अडचण दिसून येत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल देखील यावर लक्ष ठेवून आहेत. त्यांना ही गोष्ट नक्कीच त्रासदायक असणार आहे. ही गोष्ट भारतीय संघाच्या परदेशी भूमीवरील कसोटीच्या आकडेवारीबद्दल असून परदेशी भूमीवरील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा रेकॉर्ड आतापर्यन्त वाईट राहिला आहे.
टीम इंडिया परदेशी भूमीवरील कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यात अपयशी राहिली आहे. टीम इंडियाने परदेशी भूमीवर एकूण १६ वेळा कसोटी मालिकेतील ५ वा सामना खेळला असून या दरम्यान टीम इंडिया पूर्णपणे अपयशी ठरली आहे. भारत या काळात एकही सामना जिंकू शकला नाही. एकूण १६ सामन्यांमध्ये टीम इंडियाला १० सामने गमवावे लागले आहेत. तर ६ सामने अनिर्णित राहिले आहेत. आता हा विक्रम निश्चितच शुभमन गिल आणि गौतम गंभीरच्या मनात जागा झाला असेल. त्याच वेळी, हे दोघेही टीम इंडियाच्या नावावर जमा असणारा हा वाईट विक्रम मोडीत काढण्यासाठी इच्छूक असणार आहेत.
शुभमन गिल आणि कंपनीकडून ओव्हलमध्ये इंग्लंडला हरवण्याची अपेक्षा असणार आहे. या संघाने हे दोनदा केले आहे. पहिला एजबॅस्टन कसोटीतील तो ऐतिहासिक विजय आणि दुसरा चौथा कसोटी अनिर्णित राखणे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना आशा आहे की भारतीय संघ ओव्हलमध्ये देखील इंग्लंडला पराभूत करेल. जर टीम इंडियाला हे करायचे असेल तर त्यांना बॅट आणि बॉल दोन्ही आघाडीवर आपले शंभर टक्के द्यावे लागणार आहेत. त्याचबरोबर टीम इंडियाला क्षेत्ररक्षणात देखील मोठी मेहनत घ्यावी लागेल.
हेही वाचा : India vs England कसोटी मालिकेत सर्वाधिक षटके टाकणारे टॉप 5 वेगवान गोलंदाज कोणते?