शाहदी आफ्रिदी(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : India vs England कसोटी मालिकेत सर्वाधिक षटके टाकणारे टॉप 5 वेगवान गोलंदाज कोणते?
पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तिफण व्हायरल होत असल्याचे दिसून आले. या व्हिडिओमध्ये तो पुन्हा भारताविरुद्ध विष ओकताना दिसून आला आहे. या व्हिडिओमध्ये तो एका रेस्टॉरंटमध्ये असल्याचे दिसत आहे. तो म्हणत आहे की, “भारत आमच्याशी कोणत्या तोंडाने खेळेल हे मला माहित नाही, पण फक्त आमच्यासोबत खेळेल.” आफ्रिदीचेने केलेले हे वादग्रस्त विधान चाहत्यांना रुचलेले दिसत नाही.
शाहिद आफ्रिदी भारताविरुद्ध नेहमीच वाईट बोल्ट आला आहे. त्याने यापूर्वी देखील सार्वजनिक व्यासपीठांवर भारताबद्दल वाईट बोलण्याची एक देखील संधी सोडली नाही. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवुन पाकिस्तानला त्याची खरी जागा दाखवून दिली आहे.
भारताने पाकिस्तानात हवाई हल्ले करून ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केली आहेत. त्यानंतर शाहिद आफ्रिदीचा राग सुटला आणि तो भारताविरुद्ध रोज आक ओकायला लागला. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर त्याने भारतीय सैन्याबाबत देखील त्याची जीभ घसरली होती.
हेही वाचा : IND vs ENG 5th Test : पहिल्याच दिवशी पाऊस खलनायक? ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिनी नाणेफेकही अडचणीत!
भारतीय संघाचा माजी धडाकेबाज खेळाडू ज्याला गब्बर म्हणून देखील ओळखले जाते, जो सद्या इंडिया चॅम्पियन्स संघाचा एक महत्वाचा भाग आहे. आपण शिखर धवनबद्दल बोलत आहोत. त्याने वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजेंड्समध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास आधीच नकार दर्शवला होता. त्याला विचारण्यात आले की जर भारत WCL(WCL 2025) मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळणार असेल तर तू खेळणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की “तुम्ही चुकीच्या व्यक्तीला प्रश्न विचारला आहे. तुम्हाला काय वाटते मी याचे उत्तर देईन? तुम्ही हे विचारू नये. जर मी आधीच सांगितले आहे की मी सामना खेळणार नाह.”






