फोटो सौजन्य – Instagram
South Africa vs Zimbabwe : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून जेतेपद जिंकले. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फायनलचा सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती. कर्णधार टेंबा बावुमा याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 27 वर्षानंतर संघ चॅम्पियन झाला. वन टेस्ट चॅम्पियनशिप सायकलला सुरुवात झाली आहे. या सायकलमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाची पहिली मालिका ही झिम्बाब्वेविरुद्ध खेळवली जाणार आहे.
चॅम्पियन संघ आता पुन्हा एकदा त्यांची नजर 2027 मध्ये होणाऱ्या फायनलवर असणार आहे. फायनलमध्ये विजय मिळाल्यानंतर आत्ता संघामध्ये आणखी तीन नवा खेळाडूंची दक्षिण आफ्रिकेच्या संघामध्ये एन्ट्री होणार आहे. आयपीएलच्या १८ व्या सीजन मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री करणारा चेन्नई सुपर किंग स्टार फलंदाज डेवॉल्ड ब्रेविस हा आता दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी संघामध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आयपीएल 2025 मध्ये डेवॉल्ड ब्रेव्हिस याला सीझनच्या मध्यात खेळण्याची संधी मिळाली होती आणि त्याने त्याचा खेळीने क्रिकेटच्या त्यांना प्रभावित केले त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या निवडकर्त्यांचे देखील लक्ष वेधले.
झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना हा 28 जून पासून सुरू होणार आहे. या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी तीन खेळाडू पदार्पण करणार आहेत. यामध्ये डेवॉल्ड ब्रेव्हिस, लॉगन ड्र प्रोटोनियस आणि कोडी युसुफ हे तीन खेळाडू संघासाठी आज पदार्पण करणार आहेत. दक्षिण आफ्रिका चा संघ हा आजपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप सायकलला सुरुवात करणार आहे केशव महाराज या मालिकेचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
Three debutants for the Proteas! 🌟
Young guns Dewald Brevis, Lhuan-dre Pretorius, and Codi Yusuf set to make their Test debut tomorrow against Zimbabwe! 🇿🇦🧢#DewaldBrevis #ZIMvSA #Tests #Debut #Sportskeeda pic.twitter.com/dE9EUbn8O5
— Sportskeeda (@Sportskeeda) June 27, 2025