फोटो सौजन्य – X (BCCI Women)
भारत विरुद्ध इंग्लड महिला संघाचा दुसरा एकदिवसीय सामना : भारतीय महिला संघाचा एक दिवसीय मालिकेच्या दुसरा सामनाला काही तास शिल्लक आहेत. भारताच्या महिला संघाने पहिला सामनामध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. यामध्ये जेमिमा रॉड्रिक्स कमालीची भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. भारताच्या संघाने याआधी इंग्लंड दौऱ्यावर टी ट्वेंटी मालिका खेळली यामध्ये देखील भारतीय महिला संघाने या मालिकेमध्ये विजय मिळवून इतिहास नावावर केला होता.
महिला संघाचा पुढील सामना हा 19 जुलै रोजी आयोजित करण्यात आहे. एकदिवसीय विश्वचषक घेणे आधी भारतीय संघासाठी हे सराव सामने नक्कीच फायदेशीर ठरतील. भारतीय महिला संघाचे पुढील मालिकाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवली जाणार आहे. या आधी भारताचा दुसरा एक दिवसीय सामना कधी आणि कुठे खेळवल्या जाणार त्याचबरोबर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहायला मिळणार या संदर्भात सविस्तर जाणून घ्या.
IND vs ENG : मँचेस्टर कसोटी ऋषभ पंत खेळणार की नाही! मोठी अपडेट आली समोर, सराव सत्रात…
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सुरू होणारा हा 19 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या सामना भारतीय वेळेनुसार 3.30 वाजता सुरु केला जाणार आहे. मागील सामना हा भारतीय वेळेनुसार ५.30 वाजता सुरु झाला होता. या दुसऱ्या सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दुसऱ्या सामन्याचे नाणेफेक हे 3 वाजता होणार आहे. भारताच्या महिला संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवुन मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारत विरुद्ध इंग्लड याच्यामध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहायला मिळणार आहे. तर या सामन्याची लाइव्ह स्ट्रिमिंग ही सोनी लिव्ह अॅपवर पाहता येणार आहे. यासाठी तुमच्याकडे सब्स्कीबशन असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या सामन्याची स्ट्रिमिंग ही फॅनकोड अॅपवर पाहायला मिळणार आहे.
Southampton ✅
🔙 to London 🚍
With smiles 😊 and music 🎶 en route 🙌#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/nwHZ3qgQDm
— BCCI Women (@BCCIWomen) July 17, 2025
आता दोन्ही देशांदरम्यान ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे, ज्याचा पहिला सामना बुधवार, १६ जुलै रोजी साउथहॅम्प्टन येथे खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय नोंदवला. भारतीय महिलांनी इंग्लंडचा ४ विकेट्सने पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील पहिल्या सामन्यात दीप्ती शर्माची गोलंदाजी फारशी चालली नाही, परंतु बॅटने तिने भारताला सामना जिंकण्यास मदत केली आणि सामनावीर ठरली.
दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा महिला संघ कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारताच्या संघाने या सामन्याच विजय मिळवला तर टीम इंडीया इंग्लडविरुद्ध सलग दुसरी मालिका नावावर करेल.