तिलक वर्मा(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : IND vs PAK Final : BCCI ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वी विरोधात आयसीसीकडे निषेध नोंदवणार? अधिकाऱ्याने केला खुलासा
तिलक वर्माची टी-२० सरासरी ५३.४ आहे, तर विराट कोहलीची ५०.७ सरासरी असून त्यापाठोपाठ मनीष पांडेची ४३.१ आणि केएल राहुलची ४१.९ आहे. याव्यतिरिक्त, सूर्यकुमार यादवची सरासरी ३९.० आहे. तिलक वर्मा ने त्याच्या शेवटच्या १३ टी२० डावांमध्ये ९५.५ च्या सरासरीने ५०० पेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. जे त्याच्या सातत्यपूर्ण फलंदाजीचे उदाहरण आहे.
तिलक वर्मा – सरासरी ५३.४, स्ट्राईक रेट १४९
विराट कोहली – सरासरी ५०.७, स्ट्राईक रेट १३६
मनीष पांडे – सरासरी ४३.१, स्ट्राईक रेट १२६
केएल राहुल – सरासरी ४१.९, स्ट्राईक रेट १४५
सूर्यकुमार यादव – सरासरी ३९.०, स्ट्राईक रेट १७३
तिलक वर्माने ३० टी२० डावांमध्ये १३ वेळा ३०+ धावा फटकावल्या आहेत. ज्यामुळे सुरेश रैनाचा विक्रमात बरोबरीत साधली आहे. विराट कोहलीने १६ वेळा ३०+ धावा काढल्या आहेत आणि सूर्यकुमार यादवने १४ वेळा ३०+ धावा करण्याची किमया केली आहे. या विक्रमावरून हे स्पष्ट केले की, तिलक वर्मा हा केवळ युवा खेळाडू नसून तो भारतासाठी एक विश्वासार्ह खेळाडू देखील बनला आहे.
आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताची पहिल्यांदाच सुरुवात निराशाजनक झाल्याचे दिसून आले. भारताने पहिल्या पाच षटकांत २० धावांत तीन विकेट्स गमावल्या. तथापि, तिलकने सर्व जबाबदारी आपल्या खाद्यावर घेऊन भारताचा डाव सांभाळला, केवळ धावसंख्या वाढवण्याबरोबर त्याने संघाचे मनोबल देखील उंचावले. त्याने ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या, त्याला संजू सॅमसनने २४ आणि शिवम दुबेच्या २१ चेंडूत ३३ धावांची साथ मिळाली. या भागीदारीमुळे भारताने सामना ५ विकेट्सने आपल्या खिशात घातला.
हेही वाचा : IND vs PAK: पाकडे नाही सुधारणार! दहशतवाद्यांना देणार आशिया कपमध्ये मिळालेले पैसे, मसूद अजहर मालामाल






