फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs South Africa First Session : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज दुसरा कसोटी सामना हा गुवाहाटीच्या मैदानावर खेळवला जात आहे. हा सामना भारताच्या संघासाठी महत्वाचा आहे, याचे कारण म्हणजेच भारताच्या संघाला पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर त्यामुळे मालिकेमध्ये बरोबरी करण्याची संधी आहे. आजच्या सामन्यामध्ये आता पहिला सेशन पार पडला आहे यामध्ये भारताच्या संघाच्या हाती एकही विकेट लागली नाही. या पहिल्या सेशनमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी त्याची मजबूत पकड ठेवली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सेशनचा खेळ संपला आहे. यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावामध्ये फक्त १ विकेट गमावला आहे.






