हार्दिक पंड्या(फोटो -सोशल मीडिया)
IND vs SA T20I series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ५ सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला टी २० सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत हार्दिक पंड्याच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर ६ बाद १७५ धावा उभ्या केली आहेत. दक्षिण आफ्रिकेला जिंकण्यासाठी १७६ धावा कराव्या लागणार आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. ५ धावांवर भारताची पहिली विकेट गेली. शुभमन गिल ४ धावा करून माघारी गेला. त्याला लुंगी एनगिडीने बाद केले. त्यानंतर अभिषेक शर्मा १७ धावा करून बाद झाला. त्याच्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव देखील काही खास करू शकला नाही. तो १२ धावा करून बाद झाला. त्याला लुंगी एनगिडीने बाद केले. त्यानंतर आलेले तिलक वर्मा आणि अक्षर पटेल यांनी छोटेखानी भागीदारी करत भारताला सावरले. मात्र जास्त वेळ या दोघांना तग धरता आला नाही. तिलक वर्मा २६ तर अक्षर पटेल २३ धावा करून बाद झाला.
त्यानंतर आलेला हार्दिक पंड्याने मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्लाबोल चढवला. त्याने तळाच्या खेळाडूल सोबत घेत चनगलीच फटकेबाजी केली. हार्दिक पंड्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने जग त्याला सर्वोत्तम अष्टपैलू का मानते हे सिद्ध केले. आपली फलंदाजी सुरू ठेवत हार्दिकने २५ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट २०० च्या वर होता आणि तो ५९ धावा करून नाबाद राहिला आणि भारताला १७५ यापर्यंत पोहचवले. शिवम दुबे ११ धावा करून बाद झाला तर पंड्या ५९ धावा आणि जिटेश शर्मा १० धावांवर नाबाद राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर लुथो सिपामलाने २ तर फरेराने १ विकेट घेतली.
भारत T20 संघ : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (क), टिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (w), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग
दक्षिण आफ्रिका T20 संघ : क्विंटन डी कॉक(डब्ल्यू), एडन मार्कराम(सी), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे
बातमी अपडेट होत आहे…






