भारत आणि यूएई आशिया कप २०२५ सामना(फोटो-सोशल मीडिया)
IND vs UAE : आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरवात झाली आहे. काल अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात झालेल्या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. या सामन्यात अफगणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. आज १० सप्टेंबर रोजी स्पर्धेतील दूसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळला जात आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यूएई संघ प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला आहे. सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. यूएई संघाची अवस्था वाईट झालेली आहे. अंतिम अकरामध्ये स्थान मिळालेल्या कुलदीप यादवच्या गोलंदाजीने कहर केला आहे. यादवने ७ धावा देत ३ विकेट घेतल्या आहेत. यूएई संघाने ५२ धावात आपले ७ गडी गमावले आहेत.
हेही वाचा : Asia cup 2025 : भारताने जिंकला TOSS, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; कशी असणार UAE ची फलंदाजी?
यूएई संघ प्रथम फलंदाजी करत आहे. संघाची सुरवात चांगली झाली होती. परंतु, आता अवस्था वाईट झाली आहे. यूएई संघाने ९ व्या ओव्हरपर्यंत ४ विकेट गमावून ४८ धावा झाल्या आहेत. अलिशान शराफू २२, मुहम्मद जोहैब २, मुहम्मद वसीम १९, राहुल चोप्रा ३ , हर्षित कौशिक २, आसिफ खान २ धावा करून बाद झाले आहेत. ध्रुव पराशर(१) आणि हैदर अली(०)मैदानावर आहेत. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली आहे.
यावेळी भारतीय संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंवर भारतीय चाहत्यांचे सारे लक्ष होते. यावेळी कुणाला यूएईविरुद्ध अंतिम आकरामध्ये संधी मिळणार याबाबत अंदाज लावले जात होते. कारण भारतीय संघात प्रतिभावान खेळाडूंची कमी नाही. त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि टीम व्यवस्थापणासमोर संघ निवडीचा मोठा पेच निर्माण झाला होता. सर्वात आधी संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्यापैकी कुणाला संधी मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागले होते. अखेर याचे उत्तर मिळाले आहे.
भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनसह स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. भारतीय संघात अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती या फिरकी त्रिकूटाला संघात स्थान देण्यात आले आहे तर भारताचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मात्र या सामन्यात बाहेर बसावे लागले आहे. भारतीय संघात जसप्रित बूमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या हे वेगवान गोलंदाजीची धुरा वाहत आहेत. तसेच जितेश शर्माला संघात स्थान मिळेल असे बोलले जात होते , मात्र त्याला अंतिम अकरामध्ये समाविष्ट करण्यात आले नाही.
हेही वाचा : क्रीडा जगत हादरले! १६ वर्षीय अभिमन्यू मिश्राने रचला इतिहास! FIDE Grand Swiss मध्ये विश्वविजेता गुकेश पराभूत..
ही दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन आहे
इंडिया प्लेइंग इलेव्हन: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.
UAE प्लेइंग इलेव्हन: मुहम्मद वसीम (सी), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (प), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दीकी, सिमरनजीत सिंग