फोटो सौजन्य - बीसीसीआय
India vs Bangladesh toss Update : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये आज शेवटचा साखळी सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय संघाचा सेमीफायनलआधी महत्वाचा सामना असणार आहे. बांग्लादेशच्या संघाने या स्पर्धेमध्ये फक्त 1 सामन्यात विजय मिळवला आहे. भारताच्या संघाने सलग तीन सामने गमावल्यानंतर भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध सामना जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघासमोर सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. बांग्लादेशसमोर भारताचे मोठे आव्हान असणार आहे.
भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये नाणेफेक पार पडले आहे. या महिला विश्वचषक 2025 च्या शेवटच्या साखळी सामन्यामध्ये भारताच्या संघाने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये भारताच्या संघाने काही बदल केले आहेत. भारताच्या संघाची विकेटकिपर रिचा घोष ही आजचा सामना खेळणार नाही तिच्या जागेवर भारताची विकेटकिपर उमा चेत्री ही विकेटकिपिंग करताना दिसणार आहे.
भारताच्या संघामध्ये आणखी दोन बदल करण्यात आले आहेत, क्रांती गौड हिला आज विश्रांती देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आज स्नेह राणा देखील आजच्या सामन्यामध्ये खेळताना दिसणार नाहीत. तिच्या जागेवर राधा यादव खेळताना दिसणार आहे. आजचा सामना भारतीय संघासाठी सराव सामना सेमीफायनलसाठी खेळताना दिसणार आहे. रिचा घोषच्या जागेवर आज भारतासाठी उमा चेत्री संघासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे.
🚨 Toss 🚨#TeamIndia won the toss and elected to field against Bangladesh. Updates ▶ https://t.co/lkuocSlGGJ#WomenInBlue | #CWC25 | #INDvBAN pic.twitter.com/z56TH7LHv1 — BCCI Women (@BCCIWomen) October 26, 2025
आजच्या सामन्यामध्ये नवी मुबंईमध्ये पावसाचे वातावरण असल्यामुळे भारताच्या संघाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताचा संघ कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. भारताच्या संघाने सेमीफायनलमध्ये क्वालीफाय केल्यानंतर संघाने शेवटच्या सामन्यामध्ये बदल केले आहेत.
स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हरलीन देओल, जेमिमा रोड्रिक्स, उमा चेत्री (विकेटकिपर), दिप्ती शर्मा, रेणुका ठाकुर, अमनजोत कौर, राधा यादव, नल्लापुरेड्डी चरणी
एमएसटी शांजिदा माघला, रुबिया हैदर, शर्मीन अख्तर, निगार सुलताना जोटी, शोभना मोस्तारी, श्रीमती रितू मोनी, शर्मीन अक्टर, नाहिदा अक्टर, राबेया खान, निशिता अक्टर निशी, मारुफा अक्टर






